`मेरे रश्के कमर` गाण्यावर थिरकली अरबाजची गर्लफ्रेंड
जॉर्जियाने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन व्हिडीओ पोस्ट केला आहे.
मुंबई : अभिनेता - निर्माता अरबाज खान त्याच्या 'पिंच' शोमुळे चांगलाच चर्चेत आहे. अरबाज सध्या जॉर्जियाला डेट करत आहे. दोघांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र वाऱ्या सारख्या पसरत आहेत. नुकताच जॉर्जियाने सोशल मीडियावर डान्स करताना व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओ मध्ये तीने 'मेरे रश्के कमर' गाण्यावर चांगलाच ताल धराला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
जॉर्जियाने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये तिने मला हे गाणं फार आवडत असल्याचे सांगितले आहे. याआधी जॉर्जियाने 'सिम्बा' चित्रपटाच्या 'आखं मारे' गाण्यावर ताल धरला होता.
मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर अरबाज जॉर्जियाला डेट करत. हे दोघे विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले होते. तर दुसरीकडे मलायका - अर्जुनचे नाते बहरत आहे. काहीदिवसांपूर्वी मलायकाने आपल्या नात्याचा स्वीकार केला होता.