मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेता सोहेल खान आणि पत्नी सीमा खानच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना, अभिनेत्याचा मोठा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान मजेत आयुष्य जगत असल्याचं दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर अरबाज खानचे काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अरबाज गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत दिसत आहे. एवढंच नाही तर त्यांच्यासोबत अभिनेत्री शहनाज गिल देखील आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता व्हायरल झालेले फोटो पाहून तुम्हाला वाटेल की, हे फोटो नक्की कसले आहेत.. तर सध्या व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडीओ अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आहेत. 



गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त अरबाज खानने त्याच्या मित्रांसाठी एक शानदार पार्टी आयोजित केली होती. या सेलिब्रेशनमध्ये अरबाज आणि जॉर्जियासोबत शहनाज गिल सर्वाधिक चर्चेत राहिली. पार्टीत शहनाज आणि जॉर्जियामध्ये बेस्ट फ्रेंडसारखं बाँडिंग पाहायला मिळालं. 



शहनाज गिल, अरबाज आणि जॉर्जियासोबत पार्टी करताना दिसली. याआधी अर्पिता खानच्या घरी झालेल्या ईद पार्टीतही शहनाज सलमान खानच्या अगदी जवळ दिसली. सलमान आणि शहनाजचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल  झाले.  


दरम्यान, शहनाजचे व्हिडिओ आणि फोटो पाहिल्यानंतर, चाहत्यांचे म्हणणे आहे की शहनाज गिल खान कुटुंबाच्या खूप जवळ येत आहे. एवढंच नाही तर शहनाज लवकरचं सलमान खान स्टारर 'कभी ईद कभी दिवाली...' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.