Baba Siddique Murder: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर सलमान खानचं (Salman Khan) कुटुंब सध्या अनेक आव्हानांचा सामना करत आहे. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील सदस्यांनी बाबा सिद्दिकी यांची हत्या करत सलमान खानला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. याआधी गॅलॅक्सीवर गोळीबार करत इशारा दिला होता. दरम्यान हत्येनंतर कुटुंबात नेमकी काय स्थिती आहे याबाबत अरबाज खानने (Arbaaz Khan) माहिती दिली आहे. तसंच सलमान खान्या सुरक्षेची खात्री केली जात असल्याची माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खानने कुटुंब सध्या चिंतेत असल्याचं सांगितलं आहे. तसंच सलमान खान आपले चित्रपट पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचंही सांगितलं. तो म्हणाला की "आम्ही सध्या ठीक आहोत. मी असं म्हणणार नाही की आम्ही एकदम बरे आहोत, कारण कुटुंबात बरंच काही घडत आहे. नक्कीच प्रत्येकजण चिंतेत आहे. मी माझा चित्रपट बंदा सिंग चौधरीचं प्रमोशन करण्यास कटिबद्ध आहे. 25 ऑक्टोबरला माझा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट वेळेत रिलीज होईल याची मी काळजी घेत आहे. अनेक गोष्टी घडत असताना मला जे करणं भाग आहे ते करावं लागेल".


सलमान खानच्या सुरक्षेबाबात बोलताना  त्याने संपूर्ण कुटुंब त्याच्या सुरक्षेसाठी मेहनत घेत असल्याची माहिती दिली. "आम्ही अतिशय व्यवस्थित आहोत असं मी म्हणणार नाही. पण जे सर्वोत्तम आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही खात्री करुन घेत आहोत की, सरकार आणि पोलिसांसह प्रत्येकजण गोष्टी ज्याप्रकारे ठरल्या आहेत तशाच व्हाव्यात आणि सलमानची सुरक्षा व्हावी. प्रत्येकजण आपलं सर्वोत्तम देत आहे. आम्ही गोष्टी अशाच प्रकारे राहतीत हे पाहत आहोत," अशी माहिती अरबाज खानने दिली आहे.


बाबा सिद्धीकी यांच्या अंत्ययात्रेत सलमान खान भावूक झालेला दिसत होता. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे फक्त राजकारणी नाही तर मनोरंजन क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. बाबा सिद्धीकी आपल्या मोठ्या आलिशान इफ्तार पार्टीसाठी ओळखले जायचे. सलमान आणि शाहरुख खानमधील पाच वर्षांपासून सुरु असलेलं शत्रुत्व संपवण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यांच्याच इफ्तार पार्टीत दोघांनी गळाभेट घेत मैत्रीचा नवा अध्याय सुरु केला होता.