Archana Puran Singh : लोकप्रिय कॉमेडीयन कपिल शर्मा हा त्याच्या शोमध्ये सगळ्यांचे मनोरंजन करताना दिसतो. या कार्यक्रमतील अभिनेत्री अर्चना पूरन सिंगचा शूटिंग दरम्यान सेटवर एक गंभीर अपघात झाला. मुंबई ते विरारमध्ये एका प्रोजेक्टच्या शूटिंग दरम्यान, सेटवर एक अपघात झाला. सकाळी 5 वाजेच्या सुमारास एक सीन शूट करत असताना हा अपघात झालाय. यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर लगेच विले पार्लेच्या नानावती मॅक्स सुपर स्पेशलिटी रुग्णालयात तिला घेऊन जाण्यात आलं. तिथे तिच्यावर एक सर्जरी झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्चना पूरन सिंगच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. इतकंच नाही तर चेहऱ्यावर निशान देखील आहेत. अर्चनानं स्वत: तिची हेल्थ अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यावेळी तिनं तिच्या अपघाताविषयी सांगत एक डिटेल असा व्लॉग केला आहे. अर्चना पूरन सिंगनं इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिनं कॅप्शन देत लिहिलं की जे काही होतं ते चांगल्यासाठी. पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. (फक्त एक हातानं काहीही काम करण्यास किती अडथळे येतात. आता ते कळतंय. संपूर्ण व्हिडीओ माझ्या युट्यूबवर आहे. 



इन्स्टाग्राम व्हिडीओत दाखवण्यात आलं की शूटिंग सुरु होती आणि अचानकपणे अर्चनाच्या ओरडण्याचा आवाज येतोय. मग सगळे तिला रुग्णालयात घेऊन गेले. अर्चनाच्या मुलाला जेव्हा तिच्या सर्जरी विषयी कळलं तेव्हा तो भावूक झाला. व्हिडीओत पुढे तिचा नवरा परमीत म्हणाला की अर्चनाचा अपघात झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिची सर्जरी झाली. त्यावर अर्चना म्हणाली की आता तिच्या हातावर असलेली सूज कमी झाली नाही तर माझ्या हाताला खूप सूज आली होती. माझा हात खूप मोठा झाला होता. अर्चनाला खूप त्रास झाल्याचे दिसून आले.


इतकी गंभीर दुखापत होऊनही अर्चना हे बोलताना दिसून आली की ती लवकरच सेटवर परतणार आहे. अर्चनानं खुलासा केला की तिनं शूटिंगमध्येच सोडल्या कारणामुळी माफी मागण्यासाठी अभिनेता राजकुमार रावला स्वत: फोन केला होता आणि प्रोडक्शन टीमला लवकरच परत येणार याचं आश्वासन दिलं होतं. 


हेही वाचा : शाहरुख खान म्हणतोय - 'मी म्हातारा झालोय!' साऊथ सुपर स्टार्ससमोर हात जोडून केली 'ही' विनंती...


दरम्यान, अर्चनाचा नवरा परमीत सेठीनं यावर चिंता व्यक्त करत सांगितलं की मनगट फ्रॅक्चर असताना चित्रपटाचं शूटिंग कसं करणार. खरंतर, अर्चनानं सांगितलं की ती तिला झालेली गंखीर दुखापत लपवण्यासाठी तिनं तिचा संपूर्ण हात कपड्यांनी झाकला आणि रोज तीन तास शूटिंगच्या कमी शेड्यूलसोबत शूटिंग करत राहिली.