मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेला विरोधात अभिनेत्री अंकिता सिंगने ओशिवारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिताने मीरा यांच्याकडून भाडे तत्त्वावर घर घेतलं होतं. 22 डिसेंबर रोजी त्यांच्यातील घराचा करार संपला, त्याआधीचं मीरा यांनी अंकितावर घर रिकामं करण्यासाठी दबाव टाकला. पण अंकिताने घर सोडलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकिता म्हणाली, 'करार संपण्यापूर्वीचं तीन महिन्याआधी मीरा मला घर रिकामं करण्यासाठी सांगत होत्या. शिवाय त्यांनी वाईट शब्दांचा देखील वापर केला. दुसरीकडे घर मिळाल्यानंतर मी घर सोडेल असं देखील मी मीरा यांना सांगितलं..' 



'पण त्यांनी माझा विरोध केला. मी शुटिंगसाठी गेल्यानंतर त्या घराला कुलूप लावून गेल्या. त्यांनी माझं डिपॉजिट देखील दिलेलं नाही. शिवाय माझं सामान देखील दिलेलं नाही...' गेल्या चार दिवसांपासून अंकिता बेघर आहे.


ओशिवारा पोलीस स्थानकातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'अंकिताद्वारे लेखी तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी पुढे तपास सुरु आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल...' असं पोलीस म्हणाले.