मुंबई : सध्या सगळीकडे सगळ्यात जास्त चर्चा कशाची असेल तरी ती, आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची. सध्या सगळीकडे नुकूप शिखरे आणि आयरा खानच्या लग्नाची चर्चा आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची चर्चा आहे. त्यांचा हा शाही लग्नसोहळा नुकताच पार पडला. राजस्थानमध्ये यांनी थाटामाटात लग्नगाठ बांधली. या लग्नाला नुपूर आणि आयराच्या जवळ्याच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर या जोडीची रिसेप्शन पार्टी पार पडली. या रिसेप्शनला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याचबरोबर राजकीय नेते, बिझनमन या रिसेप्शमध्ये दिसले. मात्र आता समोर एक असा व्हिडीओ आला आहे ज्याची सगळ्यात जास्त चर्चा होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मराठी कलाकारही दिसत आहेत. मुख्य म्हणजे मराठीतील प्रसिद्ध ऑनस्क्रिन जोडी आयरा खानच्या रिसेप्शनला दिसली. या रिसेप्शन पार्टीत रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर एकत्र गेले होते. या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावेळी रिंकूने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती तर आकाशने काळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. या दोघांना एकत्र पाहून अनेकांनी या व्हिडीओवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रिंकू आणि आकाश रेड कार्पेटवर एकत्र येतात आणि पापाराझींना फोटोसाठी पोज देतात. यावेळी रिंकू आणि आकाश हातात हात घालून पोज देताना दिसत आहेत. यानंतर दोघंही रिसेप्शन पार्टीसाठी जातात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अनेकांनी या व्हिडीओवर लाईक कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एकाने कमेंट करत लिहीलंय की, Loved them. Both are looking elegant तर अजून एकाने लिहीलंय, दोघंही एकत्र किती सुंदर दिसत आहेत. तर अजून एकाने लिहीलंय की, आर्चीचा परशा खऱ्या आयुष्यातही एकत्र? अशा अनेक प्रकरच्या कमेंट युजर्स या व्हिडीओवर करत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.