दोनवेळा कॅन्सरवर मात केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक, कोमात गेल्यानंतर Arijit Singh चं मोठं पाऊल
दोनवेळा कॅन्सरवर मात केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीची चिंताजनक प्रकृती पाहता Arijit Singh नं जे केलं नेटकरी ते पाहतच राहिले.
मुंबई : बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्मा (Aindrila Sharma) मृत्यूला झुंज देत आहे. एंड्रिला कोमात असून तिला वाचवण्यासाठी कुटुंबानं आत्तापर्यंत 12 लाखांचा खर्च केला आहे. दरम्यान, बॉलिवूड गायक अरिजित सिंग (Arijit singh) आता एंड्रिलाच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. अरिजित मदतीसाठी पुढे आल्याचे पाहून त्याचे चाहते त्याची स्तुती करत आहे. अरिजितचं हे मोठ मन पाहून चाहते प्रचंड खूश झाले आहेत. अरिजितच्या कामाचे कौतुक होत आहे.
1 नोव्हेंबर 2022 रोजी 25 वर्षीय एंड्रिला शर्माला ब्रेन स्ट्रोक आला, त्यानंतर तिची प्रकृती अधिकच खराब होत गेली. याशिवाय तिला बऱ्याचवेळा हृदयविकाराचा झटकेही आले. अरिजित सिंग या अभिनेत्रीच्या मदतीसाठी पुढे आला आहे. एंड्रिलाच्या उपचाराचा खर्च अरिजित उचलणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. अरिजित सिंग अभिनेत्रीच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून सर्वतोपरी मदत करणार आहे. एंड्रिलानं या आधी 2 वेळा कॅन्सरवर मात केली आहे.
एंड्रिला ही व्हेंटिलेटरवर आहे आणि तिचे मेडिकलचं बिल ही 12 लाखांच्या पुढे गेले आहे, दरम्यान तिच्या कुटूंबानं मदतीची विनंती केली नाही. एंड्रिला मुर्शिदाबाद येथील आहे, जे अरिजित सिंगचे मूळ गाव आहे. म्हणूनच अरिजितला अभिनेत्रीला मदत करायची आहे. जेव्हा त्याला कळले की ती हॉस्पिटलमध्ये संघर्ष करत आहे, तेव्हा त्यानं एंड्रिलाला मदत करण्याचा निर्णय घेतला. (Arijit singh will help in bengali actress aindrila sharmas medical expenses fans praised him)
हेही वाचा : Confirm! अथिया शेट्टी - केएल राहुल लवकरच अडकणार विवाह बंधनात; Suniel Shetty नं सोडलं मौन
अरिजित सिंगच्या चाहत्यांना ही बातमी कळताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी गायकासाठी कमेंट करायला सुरुवात केली. काही नेटकरी अरिजितला फक्त स्वरांचा राजा नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या मनावर राज्य करणारा राजा असे म्हणत होते.