मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. 'इश्कजादे' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात त्याने पदार्पण केलं. 'इश्कजादे' चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री परिणिती चोप्राने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. अन्य अभिनेत्रींसोबत देखील तो झळकला पण त्याच्या करियरला कलाटणी मिळाली ती मलायकामुळे नाही तर अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आलिया भट्टमुळे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताचं मेन्स हेल्थ मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्याने आई शौरी यांच्यासोबत असलेलं नात्याबद्दल आणि अभिनेत्रींबद्दल मोठा खुलासा केला आहे. अर्जुन म्हणाला, 'माझ्या आयुष्यात परिणिती चोप्रा आणि आलिया भट्ट यांच्या सारख्या खास महिला आहेत. शिवाय माझ्या आयुष्यात शानू शर्मा (कास्टिंग डायरेक्टर) आहे.  माझ्या आयुष्यातील या अत्यंत खास महिला आहेत...' 


सांगायचं झालं तर  अर्जुन आणि परिणिती 'इश्कजादे', 'नमस्ते लंडन', 'संदीप', 'पिंकी फरार' या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. त्यानंतर अर्जुन आणि आलिया भट्ट दोघांनी '2 स्टेट्स' चित्रपटामध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. चित्रपटातील त्याचं साधेपणा प्रेक्षकांना अधिक आवडला. चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना आवडली.   
 
अर्जुनच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तो आणि मलायका अरोरा रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबुली देखील दिली आहे. दोघांमध्ये असलेल्या वयाच्या अंतरामुळे तिला कायम ट्रोल केलं जातं.  तर अनेकवेळा त्यांना लग्न कधी करणार  असा प्रश्न विचारण्यात येतो.