`अर्जुन कपूर XX@ है...`, नको तिथे तोंड खुपसणं अभिनेत्याच्या अंगाशी
`आ बैल मुझे....`
Arjun Kapoor : अभिनेता अर्जुन कपूर हा सहसा कोणत्याही वादात अडकत नाही. तो भला आणि त्याचं आयुष्य भलं.... असंच आतकापर्यंत चाहत्यांनीही पाहिलं. पण, आता मात्र हे चित्र बरंच बदललं आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये अर्जुननं चित्रपटांवर बंदीची होत असणारी मागणी आणि बदलणारा प्रेक्षवर्ग या मुद्द्यावर आपलं मत मांडलं आणि आता यामुळंच तो टीकेचा धनी झाला आहे. #Arjunkapoor
गेल्या काही वर्षांमध्ये प्रेक्षकांकडून काही चित्रपटांवर बंदी आणण्याची सातत्यानं वाढणारी मागणी पाहता, यावर व्यक्त होत अर्जुननं कलाकारांची मौन भूमिका या साऱ्याला वाव देऊन गेली, अशी प्रतिक्रिया दिली. (Boycott Bollywood )
वाचा : 'शांत राहिलो तिथेच चुकलो'; कोणत्या गोष्टीची अर्जुन कपूरला इतकी खंत?
सेलिब्रिटींच्या सामंजस्य आणि समजुतदारपणाचाच अनेकांनी फायदा घेतल्याचं म्हणत त्यानं या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. पण, त्याचं हे वक्तव्य मात्र काहींना रुचलं नाही. मुळात अर्जुनच्या चित्रपटांना कोणत्याही प्रकारचा विरोध करण्यात आला नसतानाही या मुद्द्यावर व्यक्त होत त्यानं नकळतपणे स्वत:वरही प्रेक्षकांचा रोष ओढावला. (Arjun kapoor gets trolled for reaction on boycott trend in bollywood)
अभिनेत्याचं हे वक्तव्य पाहून, मग काय... सोशल मीडियावर मीम्सवर मीम्स पोस्ट केले जाऊ लागले. नको तिथे बोलणं, कशा प्रकारे आपल्यावरच उलट फिरु शकतं हेच सांगणारे उपरपोधिक मीम्स नेटकऱ्यांनी अर्जुनला उद्देशून पोस्ट केले.