मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. दोघं एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत. अनेकदा दोघं सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने फिरताना दिसतात. या दोघांची चर्चा वेगवेगळ्या कारणाने होताना दिसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत अर्जुन कपूरने मलायका अरोराबाबत एक गोष्ट शेअर केली. अर्जुनला मलायकाकडून तू काय शिकलास? हा प्रश्न विचारण्यात आला. 'माझं मलायकावर किती प्रेम आहे? हे मी सांगू शकत नाही. 20 वर्षांची असल्यापासून ते अगदी आतापर्यंत ती आहे तशीच आहे. एक स्वातंत्र्य महिला होण्याच्या नात्याने ती खूप छान आयुष्य जगत आहेत.' 



पुढे तो म्हणाला,'ती फक्त आपल्या कामामुळे आणि बोलण्यामुळे एकमेकांना विश्वास निर्माण करणारी आहे. ती असं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते की ज्यामुळे ती फक्त आनंदी राहिल. मी प्रत्येक दिवशी तिच्याकडून काही ना काही शिकतो. मलायका आणि अर्जुन यांची बॉडिंग खूप वेगळी आहे. सुरूवातीला या दोघांचं नातं कुणी स्विकारली नाही. मात्र आता मोकळेपणाने हे दोघं एकमेकांसोबत वावरताना दिसत आहे. एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.'



कामाबद्दल बोलायचं झालंय की, अर्जुन कपूर सरदार का ग्रँडसन सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमात रकुल प्रीत देखील महत्वाची भूमिका साकारत आहे. त्यासोबतच ती खलनायक 2 आणि भूत पोलीसमध्ये दिसणार आहे. भूत पोलीसमध्ये सैफ अली खानसोबत दिसणार आहे. 


मलायका अरोर आपल्या फिटनेस रुटीन, वर्कआऊट व्हिडिओमुळे कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर पोस्ट देखील करत असते.