अरबाज आणि मलायकाच्या लग्नात असा दिसत होतो अर्जुन कपूर, फोटो पाहून व्हाल हैराण
मलायका आणि अर्जुन हे लोकप्रिय कपलपैकी एक आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशिपची नेहमची चर्चा सुरु असते. त्यांच्या विषयी छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना असते. दोघे कधी लग्न करणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना आहे. मात्र या जोडप्याने अद्याप लग्नाची घोषणा केलेली नाही. लवकरच दोघेही लग्नाच्या बंधनात अशी चर्चा आहे. मलायका अर्जुनपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे आणि वयातील अंतरामुळे ती नेहमीच चर्चेत असतात. पण मलायकाच्या लग्नाच्या वेळी अर्जुन कसा दिसत होता हे तुम्हाला माहीत आहे का? (Arjun Kapoor Malaika Arora Relationship)
अरबाज मलायकाच्या लव्हस्टोरीची चर्चा एकेकाळी रंगली होती. असे म्हटले जाते की, दोघेही त्यांच्या पहिल्या भेटीतच प्रेमात पडले. दोघे जवळपास पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. 1998 मध्ये अरबाज आणि मलायका यांनी हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेनुसार लग्न केलं. पण या लग्नात अर्जुन कसा दिसत होता हे तुम्हाला माहीत आहे का?
25 वर्षीय मलायकाने लग्नाच्या चार वर्षांनंतर म्हणजेच 2002 मध्ये मुलाला जन्म दिला. अरबाज आणि मलायकाचं वैवाहिक जीवन हे जवळपास 15 वर्ष आनंदी होतं. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये मतभेद झाले आणि हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं. 2017 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुन रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले.
मलायका आणि अरबाज यांनी घटस्फोटानंतर पाच वर्षानंतरही दोघांनी लग्न केलेले नाही. पण दोघेही त्यांच्या रिलेशनशिपमध्ये खूप आनंदी आहेत. सध्या अरबाज खान 22 वर्षांनी लहान असलेल्या मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्याचबरोबर मलायकाही अर्जुनसोबत तिच्या लव्ह लाईफचा आनंद घेत आहे.