मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर त्याचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन 2'च्या प्रदर्शनाची तयारी करत आहे आणि त्याबद्दल सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, अर्जुन कपूरने त्याची सहकलाकार तारा सुतारियाचं कौतुक केलं असून तारासोबत त्याची नॅचरल केमिस्ट्री असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटात अर्जुन आणि तारा व्यतिरिक्त जॉन आणि दिशा देखील मुख्य भूमिकेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन म्हणाला, ''एक व्हिलन 2 च्या ट्रेलरमध्ये लोकांना तारा आणि मला मिळणार तुमचं प्रेम पाहून  खरोखर खूप चांगल वाटत आहे. मला आनंद आहे की, ते आमच्या केमिस्ट्रीचं कौतुक करत आहेत आणि आम्ही एकमेकांसोबत कसे दिसतो. आमची एकमेकांसोबत नैसर्गिक केमिस्ट्री आहे. आणि आम्ही एकमेकांची उर्जा वाढवतो."


अभिनेता पुढे म्हणला, "प्रत्येक नवीन आणि ताज्या ऑन-स्क्रीन जोडीला प्रेक्षकांच्या कसोटीवर उतरावं लागतं. हे लोकं ठरवतात की ते पडद्यावर ही नवीन जोडी पाहण्यास उत्सुक आहेत की नाही. हे खूप छान वाटतं की, तारा आणि माझं कौतुक होत आहे.  आणि जेव्हा तुम्ही आम्हाला चित्रपटात पहाल तेव्हा आम्ही तुमच्यासमोर येण्याची वाट पाहू शकत नाही."


अर्जुन पुढे म्हणाला, "प्रेक्षक बर्‍याच गोष्टी ठरवतात, तारा आणि मी चित्रपटात भरपूर मसाला जोडतो आणि मला आशा आहे की, आमची जोडी आश्चर्यकारक कामगिरी करेल." वर्कफ्रंटवर बोलायचं झालं तर, मोहित सूरीच्या 'एक व्हिलन 2' मध्ये दिसण्याव्यतिरिक्त, अर्जुन 'आस्कमन' भारद्वाजच्या 'कुट्टी' आणि अजय बहलच्या 'द लेडीकिलर'मध्ये देखील दिसला आहे.