Boyfriend च्या मिठीत दिसली अर्जुन कपूरची बहिण; फोटो Viral होताच चर्चांना उधाण
झगमगत्या विश्वातील आणखी एक नवं कपल समोर, अर्जुन कपूरच्या बहिणीचे बॉयफ्रेंडसोबत फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...
Anshula Kapoor with Boyfriend : झगमगत्या विश्वात कायम सेलिब्रिटींच्या प्रेम प्रकरणांबद्दल चर्चा रंगलेली असते. बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. आता अभिनेता अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) बहिण अंशुला कपूरच्या (Anshula Kapoor) खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे. सध्या अंशुलाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अंशुला तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे. दोघांचे फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण आलं आहे.
प्रेमात आहे अंशुला कपूर
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूर सध्या बँकॉकमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. खुद्द अंशुलाने बॉयफ्रेंडसोबत काही फोटो शेअर केले आहेत. बँकॉकमध्ये अंशुलाने गायक मरुनच्या कॉन्सर्टला देखील बॉयफ्रेंडसोबत हजेरी लावली. अंशुलाच्या बॉयफ्रेंडचं नाव रोहन ठक्कर आहे. (screenwriter rohan thakkar)
रोहन ठक्कर एक स्क्रिन रायटर आहे. याआधी देखील दोघांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली. पण आता अंशुलाने आता रोहनसोबत खास फोटो शेअर करत सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता अर्जुन कपूरच्या अफेअरनंतर अभिनेत्याच्या बहिणीची लव्हलाईफ समोर आली आहे. (mona shourie kapoor)
अंशुलाने रोहनसोबत काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. अंशुला इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत म्हणाली, 'माझ्या वाढदिवसाच्या महिन्याची आनंदी सुरुवात. खूप डान्स केला... रात्री एक वाजता पायाची मसाज हवी होती कारण मी वेदना विसरू शकेन. माझ्या स्वप्नातही वाटले नव्हते की मी कधी कॉर्सेट टॉप घालेन आणि मला त्यात खूप मजा येईल. हे नेहमीच्या प्रेम प्रकरणासारखे आहे.' (anshula kapoor net worth)अंशुलाच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. (anshula kapoor profession)