भर शोमध्ये अर्जुन कपूरचा पारा चढला, आरजेच्या लगावली कानशिलात
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.
मुंबई : बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. यासोबतच अर्जुन कपूर कधी-कधी त्याचा राग आणि संतप्त प्रतिक्रियांमुळे चर्चेत येतो. आज आम्ही तुमच्यासाठी अभिनेत्याचा असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे स्पष्ट होतं की, अर्जुन लगेजच त्याचा मूड बदलून कोणतंही पात्र जगू लागतो.
अर्जुन कपूर संतापला
खरंतर हा अर्जुन कपूरचा खूप जुना व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर रागावलेला दिसतोय आणि आरजे अर्पितने प्रश्न विचारताच त्याच्या कानाखाली मारतोच पण त्याचा कॅमेराही तोडतो.
कॅरेक्टरशी संबंधित प्रश्नावर मारली कानाखाली
अर्जुन कपूरचा हा व्हिडिओ 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'की एंड का' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे. यादरम्यान अर्जुन आरजे अर्पितसोबत बोलताना दिसत आहे. आरजेने त्याला प्रश्न विचारला की, 'अर्जुन, कॅरेक्टर मार्केटमध्ये कोणतं कॅरेक्टर संपलं आहे, आजकाल मुलींचं कॅरेक्टर कोण करतं.' हा प्रश्न ऐकून अर्जुन कपूरला खूप राग येतो आणि तो आरजेच्या कानाखाली मारतो..
अर्जुन कपूर आणि आरजेचा प्रँक
अर्जुन कपूर आरजेला म्हणतो, ' हा काय प्रश्न आहे, कॅमेरा बंद कर, कॅमेरा बंद कर.' अर्जूनला इतका राग येतो की, त्याने कॅमेराही तोडला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, हा एक प्रँक व्हिडिओ आहे.