आरोह वेलणकरने केलं खास Pre Wedding फोटोशूट
`रेगे` या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या आणि अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झालेला आरोह वेलणकर.
मुंबई : 'रेगे' या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या आणि अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झालेला आरोह वेलणकर.
आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे, आरोह लवकरच बोहल्यावर चढणार आहे. काही दिवसांपूर्वी आरोहने त्याच्या फेसबुक पेजवर त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा त्याचा एक रोमँटीक फोटो शेअर केला होता. शेअर केलेल्या फोटोला आरोहने रोमँटीक अशी कॅप्शनही दिली होती.आरोहची खास मैत्रिण अंकिता शिंगवीसह तो लग्गबंधनात अडकणार आहे.
पुण्यात असताना दोघे एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.कॉलेजमध्ये असताना दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांत पुढे प्रेमात झाले.त्यामुळे आता ब-याच वर्षाच्या नात्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
इथे केले खास फोटोशूट
येत्या ११ डिसेंबरला हा विवाहसोहळा महाबळेश्वर येथे पार पडणार आहे. त्या अगोदर आरोहने खास प्री - वेडिंग फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटची खास गोष्ट म्हणजे हे शूट ख्यातनाम दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या स्टुडिओत केलं आहे. या फोटोशूटसाठी स्टुडिओ दिल्यामुळे नितीन देसाईंचे आभार देखील मानले आहे.
टेक्नोसॅव्ही विवाहसोहळा
हा विवाहसोहळा टेक्नोसॅव्ही असणार असे म्हटले जात आहे.टेक्नोसॅव्ही ऐकताच तुम्हाला प्रश्न पडला असणार,आता पर्यंत थीम वेडींग, ट्रेडिशनल, इंडो-वेस्टर्न वेडींग ऐकलंय तर टेक्नोसॅव्ही वेडींग नेमकं काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.तर टेक्नोसॅव्ही वेडींग म्हणजे आरोहने ‘आरोह वेड्स अंकिता’हे एक अॅप लाँच केले आहे.त्यात त्याच्या लग्नाबद्दल सर्व माहिती या अॅपद्वारे पाहुण्यांना कळणार आहे. सर्व नियोजन स्मार्ट अॅप पद्धतीने होणार आहे.त्यामुळे अनेक वैशिष्ट्यांनी परिपणूर्ण असलेला हा विवाहसोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.सध्या मराठी इंडस्ट्रीतह एका पाठोपाठ होणा-या लग्नांमुळे आता आरोहच्या लग्नाचीही उत्सकुता असल्याचे पाहायला मिळत आहे.