मुंबई : पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री अर्शी खान पहिल्यांदा चर्चेत आली ती... आपल्या आणि पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीसोबत असलेल्या  नातेसंबंधांमुळे... अर्शीनं शाहीद सोबत आपण शारीरिक संबंधात असल्याचं सोशल मीडियावर जगजाहीरपणे सांगितलं... आणि भारत-पाकिस्तानमध्ये याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. परंतु, आता मात्र आपलं ते वक्तव्य खोटं असल्याचं स्पष्टीकरण अर्शी खाननं दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका भारतीय रिअॅलिटी शोमध्ये दिसलेली अर्शी अनेक भारतीयांच्याही पसंतीस उतरली होती. आता पुन्हा ती राजीव खंडेलवालचा चॅट शो 'जजबात'मध्ये दिसली... या कार्यक्रमात अर्शीनं आपली चूक स्वीकार केली. इतकंच नाही तर आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अर्शीनं आपल्या ट्विटबद्दल खुलासा करताना म्हटलंय की आपल्याला आफ्रिदीसोबत नातेसंबंधात यायला आवडेल इतकंच नाही तर आफ्रिदीसोबत बेड शेअर करायलाही तिला आवडेल, असं तिनं म्हटलंय. 


मी आफ्रिदीचा खूप आदर करते. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. माझे ते ट्विट एक चूक होती... मला त्यांचं नाव इतक्या सेन्सेटिव्ह इश्युजमध्ये खुलेपणानं घेणं टाळायला हवं होतं. आफ्रिदी साहेबांचे माझ्यावर खूप उपकार आहेत... असं अर्शी खान हिनं राजीवच्या कार्यक्रमात बोलताना म्हटलंय. 


२०१५ मध्ये अर्शी खाननं एक ट्विट केलं होतं... यात 'होय, मी आफ्रिदीसोबत सेक्स केलाय. मला कुणासोबत झोपण्यासाठी भारतीय परवानगीची गरज आहे का? हे माझं खाजगी जीवन आहे' असं तिनं म्हटलं होतं. यानंतर एका मुलाखतीत तिनं आपण आफ्रिदीसोबत नात्यात असल्याचीही पुडी हळूच सोडून दिली होती. परंतु, आता मात्र ते सगळं खोटं होतं आणि आपल्या चुकीची आपल्याला कल्पना असल्याचं अर्शीनं मान्य केलंय.