Oscar Award 2024: `ऑस्कर्स`नेही ठेवली नितीन चंद्रकात देसाईंची आठवण! पाहा त्या भावूक क्षणाचा Video
Nitin Desai Remembered At Oscars : Oscar 2024 मध्ये आर्ट डायरेक्टर नितीन देसाई यांना वाहिली श्रद्धांजली
Nitin Desai honoured at Oscars 2024: आज सकाळी 96 वा अकादमी पुरस्कार सोहळा पार पडला. तर यंदाचा ऑस्कर पुरस्कार हा 'ओपनहायमर' च्या नावी झाल्याचे म्हणून शकतो. या सोहळ्यात 'ओपनहायमर' ला 7 पुरस्कार मिळाले. किलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी आणि क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. 'पुअर थिंग्स'साठी एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर या पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांचे लक्ष हे नितीन देसाई आणि कोरियन अभिनेता ली सुन क्युनला वाहिलेल्या श्रद्धांजलीनं लक्ष वेधलं आहे.
ऑस्कर 2024 मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आर्ट डायरेक्टर नितीन देसाई यांचं संपूर्ण नाव नितीन चंद्रकांत देसाई दाखवण्यात आलं. त्यासोबत त्यांची एक क्लिपही दाखवण्यात आली. या क्लिपमध्ये नितीन देसाई यांचा फोटो ही दाखवण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीतील नितीन देसाई यांचे योगदान पाहता ऑस्करनं त्यांना ट्रिब्यूट दिला आहे. यासारखीच एक क्लिप पॅरासाइट अभिनेता ली सन-क्युनची दाखवण्यात आली. ज्यात त्याचा फोटो होता. फक्त त्या दोघांनाच नाही तर त्यांच्यासोबत अनेक कलाकारांना ज्यांनी या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे त्यांना श्रद्धांजली वाहिण्यात आली आहे.
2 ऑगस्ट 2023 नितीन चंद्रकांत देसाई यांचं निधन झालं. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नितीन देसाई एक लोकप्रिय भारतीय आर्ट डायरेक्टर, प्रोडक्शन डिझायनर आणि चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्माते होते. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत केलेल्या कामासाठी ते ओळखले जातात. त्यांनी 'हम दिल दे चुके सनम', 'लगान', 'देवदास' , 'जोधा अकबर' आणि 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटांसाठी काम केलं. नितीन यांनी त्यांच्या करिअरच्या 20 वर्षांमध्ये आशुतोष गोवारिकर, विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांच्या अनेक चित्रपटांसाठी काम केलं.
हेही वाचा : Oscar Awards 2024 Oppenheimer : ऑस्कर 2024 मध्ये 'ओपनहायमर' चा डंका, 1 नाही 2 नाही तब्बल 7 पुरस्कार
नितीन देसाई यांनी 4 वेळा सर्वोत्कृष्ट आर्ट डायरेक्शनसाठी नॅशनल पुरस्कार जिंकला. त्यासोबतच त्यांना 3 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. नितीन देसाई यांनी 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'परिंदा' या चित्रपटातून आर्ट डायरेक्टर म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन विधु विनोद चोप्रा यांनी केले होते. चित्रपटात जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित सारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.