धक्कादायक : कला दिग्दर्शक राजेश मारुती सपाते यांची आत्महत्या, व्हिडिओ शेअर करत सांगितलं कारण
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलादिग्दर्शक राजू सापते यांनी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली आहे.
मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलादिग्दर्शक राजू सापते यांनी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली आहे.. राजेश मराठी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. त्यांनी पुण्याच्या घरी आत्महत्या केली आहे. राजेशने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, ज्यामध्ये त्यांनी आपलं आयुष्य का संपवलं हे सांगितलं आहे.
व्हिडिओमध्ये राजेशने लेबर युनियनचे सदस्य राकेश मौर्यवर बराच काळ मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे त्यांनी इतकं मोठं पाऊल उचललं आहे. ते व्हिडिओमध्ये पुढे म्हणाले की, मी प्रत्येकाचं कर्जदेखील दिलं आहे. तरीही, तो मला काही लोकांना कडून फोन करुन त्रास देत होता.
न्याय देण्याची केली मागणी
रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, ''नमस्कार मी राजेश मारुती सपते. मी एक कला दिग्दर्शक आहे. मी कुठल्याही नशेत नाहीये. पूर्ण विचार केल्यानंतरच मी हा निर्णय घेतला आहे. मी हा निर्णय घेतला आहे कारण, काही गोष्टी मला त्रास देत होत्या. गेल्या काही दिवसांपासून लेबर युनियनचे सदस्य राकेश मौर्य मला त्रास देत आहेत. मी कामगारांचे सर्व पैसे दिले आहेत. राकेश मौर्य कामगारांना भडकवत आहेत त्यामुळे माझे बरेच प्रोजेक्ट अडकले आहेत.
राकेश मौर्य मला पुढचं काम सुरू करू देत नाही. माझ्याकडे प्रोजेक्ट आहेत पण राकेशने कामगारांना माझ्याविरूद्ध भडकावलं म्हणून मी माझं काम सुरू करू शकणार नाही. ज्यामुळे मला बरेच प्रोजेक्ट सोडावे लागले याचा निषेध म्हणून मी माझं आयुष्य संपवत आहे. मला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा''. राजू सापते यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.