मुंबई : 'फर्क बहोत कर लिया, अब फर्क लायेंगे...' अभिनेता आयुषमान खुरानाचा 'आर्टिकल-१५' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आयुषमान एका पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सोमवारी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. आयुषमानने ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाचा टीझर रिलीज करत कॅप्शनमध्ये 'धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान याबाबत आता कोणीच भेदभाव करणार नाही. देशात आता बदलाची गरज आहे.' असे लिहिले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर राज्य आता आपल्या नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. 'आर्टिकल-१५' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारलेला आहे. आर्टिकल १५ मध्ये काय नमुद करण्यात आले आहे, याचे विश्लेषण चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 


भारतीय संविधानातील कलम १५ मध्ये सर्व नागरिकांना समानतेचा हक्क असल्याचे नमुद करण्यात आले आहे. भारतीय नागरिकांमध्ये धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ शकत नाही. 'आर्टिकल-१५' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनुभव सिन्हा यांच्या खांद्यावर आहे. चित्रपटाचा ट्रेलर ३० मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.