मुंबई : सिंगिंग रियलिटी शो (Singing Reality Show), इंडियन आयडल 12 ची  (Indian Idol 12) सर्वत्र तुफान चर्चा रंगलेली असते. जेव्हा शोची सुरूवात झाली तेव्हापासून अरूणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र पसरल्या. शो मेकर्सद्वारा त्यांच्या नात्याला लव्ह एँगल देण्यात आला. त्यांच्या एँगलची सोशल मीडिया टीका देखील करण्यात आली. पण शेवटपर्यंत या दोघांच्या जोडीने आणि गोड आवाजाने सर्वंचं लक्ष वेधून घेतलं. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे आज शोच्या विजेत्याचं नाव जगासमोर येणार आहे. तेव्हा अरूणिताने पवनदीपसोबत रंगलेल्या चर्चांना पूर्णविरा दिला. अरूणिताने त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. अरूणिता म्हणाली, 'आमच्यात लव्ह एंगल नाही. आम्ही सर्व चांगले मित्र आहोत. अम्ही एका घट्ट नात्यात बांधलो आहेत. आम्ही गेल्या कित्येक महिन्यांपासून एकत्र काम करत आहोत. एक साथ गात आहोत. आता आम्ही एका कुटुंबाप्रमाणे आहोत.'



पुढे अरूणिता म्हणाली, 'आम्ही फक्त आणि फक्त रिहर्सलचा विचार करत असतो. आमच्या रिकाम्या वेळेतही आम्ही म्युझीकबद्दल बोलत असतो. एकमेकांच्या रिऍक्शनबद्दल चर्चा करत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर काय  सुरू आहे, हे वाचण्यासाठी आम्हाला वेळ नसतो.' असं अरूणिता म्हणाली.