मुंबई : ड्रग्स प्रकरणात जामीनावर सुटलेल्या आर्यन खानने एनसीबी ऑफीसमध्ये हजेरी लावली आहे. काही वेळापूर्वी आर्यनचे वकीलही एन सी बी कार्यालयात दाखल झाले होते. आता आर्यन 12 वाजून 20 मिनिटांनी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. दर शुक्रवारी आर्यनला एनसीबीत हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 30 ऑक्टोबरला आर्यनला काही अटींवर जामिन मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यन खान जामिनावर बाहेर आहे. आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार त्यांना दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. आर्यन खान 30 ऑक्टोबर रोजी तुरुंगातून बाहेर आला होता.



NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत छापा टाकून अमली पदार्थ जप्त केले होते. याच आरोपाखाली आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर सर्वांना अटक करण्यात आली. एनसीबीने या प्रकरणी सुमारे 20 जणांना अटक केली असून, त्यापैकी अनेक जण जामिनावर बाहेर आले आहेत.