मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 30 ऑक्टोबरला तुरंगातून आपल्या घरी परतला. आर्यन खान जवळपास ३ आठवडे तुरुंगात होता. त्याच्यावर ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे, त्यामुळे त्याला एनसीबीने अटक केली होती. आर्यन खानला या प्रकरणात जामीन मिळणे इतके सोपे नव्हते. ज्यामुळेच त्याला बाहेर येण्यासाठी त्याला बराच काळ लागला. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा 9 लोकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मेहनतीमुळेच आर्यनला जामीन मिळाला आहे.


शाहरुख खान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लिस्टमध्ये अर्थात पहिलं नाव आहे, शाहरुख खान. जेव्हा आर्यन खानला एनसीबीनं ताब्यात घेतलं तेव्हापासून शाहरुख खान रात्रंदिवस एक करुन आपल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करु लागला. जमेल तेवढं आणि जमेल त्याच्याकडून तो मदत घेत होता.


सलमान खान


अभिनेता सलमान खान आपल्या मित्राच्या वाईट काळात खांद्याला खांदा लावून उभा राहिला आणि त्याला प्रत्येक पावलावर मदत केली. सलमान खानने आपल्या मित्राला प्रत्येक वेळी पाहिजे ती साथ दिल्याचे बोलले जाते.


पूजा ददलानी


शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी कुटुंबीयांप्रमानेच रात्रंदिवस एक केली. तिच्यावर एनसीबीने आरोपही लावले पण आर्यनला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी तिने कोणतीही कसर सोडली नाही.


करण जोहर


आर्यन खानला अटक झाली तेव्हा करण जोहर मुंबईबाहेर होता. शाहरुखच्या वाईट काळात तो लगेच मुंबईत आला आणि बड्या वकिलांसह शाहरुख खानचे घर गाठले.


सतीश मानेशिंदे


आर्यनला तुरुंगातून बाहेर काढण्याची जबाबदारी वकील सतीश मानशिंदे यांच्या खांद्यावर होती. आर्यनला जामीन मिळवून देण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही एनसीबीकडे नव्हती. ज्यामुळे कोर्टातून जामीन मिळवून देण्यात त्यांना यश आले.


रवी सिंग


आर्यन खान ड्रग प्रकरणादरम्यान शाहरुख खानचा अंगरक्षक रवी सिंग सतत चर्चेत राहिला. रवी सिंह यांनी खान कुटुंबाचा त्रास बऱ्याच अंशी कमी केला. आर्यनला गर्दीतून घरी आणण्याची जबाबदारीही रवी सिंगच्या खांद्यावर होती.


अमित देसाई


आर्यन खानच्या जामीनात अमित देसाईचीही महत्त्वाची भूमिका होती. आर्यनच्या जामीनाला झालेल्या विलंबावर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, त्याचा परिणाम दिसून आला आणि आर्यनला जामीन मिळालं.


मुकुल रोहतगी


मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या वतीने वकील मुकुल रोहतगी यांनी उलटतपासणी घेतली आणि जामीन मिळेपर्यंत त्यांनी अनेक प्रश्न उचलून धरले. मुकुल यांनी सतीशच्या टीमसह हे प्रकरण नीट समजून घेत उच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला.


जुही चावला


आर्यन खानच्या जामीनावेळी अभिनेत्री जुही चावलाने जामीनदाराची भूमिका साकारली होती. शाहरुख खानची वर्षानुवर्षे जुन्या मैत्रीनीने त्याच्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यात मदत केली.


नवाब मलिक


आर्यन खानच्या अटकेनंतर नेते नवाब मलिक यांनी एनसीबीबाबत असे अनेक खुलासे केले की, प्रकरण पूर्णपणे बदलले. नवाब मलिकांनी अजूनही समीर वानखेडे विरोधात काही प्रश्न उचलून धरले आहे.