संकटमोचक सलमान, शाहरूखला दिलेला शब्द पाळला : VIDEO
सलमान - शाहरूख दोघंही भावूक, पाहा व्हिडिओ
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) चर्चेत आहे. शाहरूखचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात NCB च्या ताब्यात आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा शाहरूखच्या भेटीला सर्वात अगोदर सलमान खान गेला. सोशल मीडियावर याची फार चर्चा रंगली. याच दरम्यान सलमानचा आणखी एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला. सलमानने शाहरूखला दिलेला शब्द पाळला.
शाहरूख खानने सलमान खानला एक भावून आवाहन केलं होतं. 'माझ्या कुटुंबावर कधी संकट आलं तर तू साथ देशील?'शाहरूखच्या या भावूक प्रश्नाला सलमानने सकारात्मक प्रतिसाद दिली होता. या व्हिडीओत दोघं एकमेकांची गळाभेट घेत आहेत.
रविवारी आर्यनला अटक करण्यात आली. त्यानंतर ४ ऑक्टोबरला त्याची कोठडी ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. आज आर्यन खानची एनसीबी कोठडी संपत आहे. मात्र, काल रात्री उशिरा एनसीबीनं मुंबईतून एका परदेशी ड्रग पेडलरला अटक केल्यानंतर आर्यन खानची कोठडी वाढवण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. दरम्यान शाहरुख खान आणि सलमान खानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जेव्हा शाहरुखचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली तेव्हा सलमान खान शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. केवळ सलमानच नाही तर त्याची बहिण आणि सोहेल खानची पत्नी सीमा खान देखील शाहरुखच्या घरी गेली होती.
तामिळ दिग्दर्शक एटली यांचा आगामी चित्रपट ही अडकला आहे. किंग खानचा हा आगामी चित्रपट आहे. यामुळे निर्मात्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान चर्चा आहे की, एटलीच्या चित्रपटाच्या शूटिंगवर त्याचा परिणाम होऊ शकला नाही. म्हणूनच निर्मात्यांनी शाहरुख खानचा बॉडी डबल असलेला प्रशांत वालदे याला बोलावले आहे.