मुंबई : स्टारकिड्स म्हटलं तर कायम मज्जा, मस्ती आणि रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या... अनेकदा स्टारकिड्सला पार्टी करताना स्पॉट करण्यात आल आहे. आता अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पुन्हा एका क्लबमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. एनसीबीकडून निर्दोष घोषित केल्याने आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानला अनेक दिवस तुरुंगात काढावे लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, न्यायालयाने आर्यनचा जप्त केलेला पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले. त्याला आता पासपोर्ट देखील मिळाला आहे. ड्रग्ज प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर आर्यन खानला पुन्हा क्लबमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. आर्यनला यापूर्वी अनेकदा नाईट क्लबमध्ये पार्टी करताना पाहिलं. 


सध्या आर्यनचा क्लबमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. क्लबमध्ये आर्यन मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. ड्रग्स प्रकरणातून सुटल्यानंतर आर्यन पुन्हा क्लबमध्ये दिसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आर्यनचा क्लबमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक कमेंट येत आहेत. त्यामुळे शाहरुखच टेन्शन पुन्हा वाढणार का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. 


दरम्यान, आर्यन खान लवकरच रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित वेब सीरिजमध्ये पदार्पण करणार आहे. सीरिजमध्ये आर्यन लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहे. सुहाना खानप्रमाणे आर्यन खानला अभिनयात रस नाही. अस असूनही, आर्यन खानची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. ड्रग प्रकरणादरम्यान त्याला त्याच्या चाहत्यांचा आणि इंडस्ट्रीतील लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला.