मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका पार्टीचा असल्याचं सांगण्यात येत असून आजूबाजूच्या वातावरणावरून हा व्हिडिओ पब किंवा बारमधील असल्याचं स्पष्ट होत आहे. व्हिडिओमध्ये आर्यन त्याच्या अनेक मित्रांसोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहे. यादरम्यान कोणीतरी आर्यन खानचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यन खानचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आर्यन टेबलवरून एक ग्लास उचलतो. आणि त्यामधलं ड्रिंक पिऊन टाकतो. आणि नंतर तो ग्लास पुन्हा टेबलवर ठेवतो. आर्यनचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोकं आर्यनला ड्रिंक प्यायल्यामुळे ट्रोल करत आहेत, तर काही लोकं म्हणत आहेत की, त्याच्या वैयक्तिक स्पेसचा आदर केला पाहिजे.


पार्टीत मसरूफ आर्यन खान
आर्यन खान एका क्लबमध्ये असून तो आपल्या मित्रांसोबत पार्टीमध्ये व्यस्त असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यासोबतच तो ड्रिंक करतानाही दिसत आहे. यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता. पण ड्रिंक करत असताना त्याने मास्क काढून टाकला आणि ड्रिंक प्यायल्यानंतर त्याने पुन्हा मास्क चेहऱ्यावर लावला. व्हिडिओ समोर आल्यानंतर आर्यन खान पुन्हा चर्चेत आला आहे.



ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाली
आर्यन खानला NCB ने मागच्या वर्षी ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. तो अनेक दिवस तुरुंगातही होता. मात्र, नंतर त्याला एनसीबी कोर्टातून क्लीन चिट मिळाली. एनसीबीने पुराव्याअभावी आर्यन खानसह ५ जणांना सोडलं. एवढंच नाही तर विशेष न्यायालयाने आर्यन खानचा पासपोर्ट परत करण्याचे आदेशही जारी केले आहेत.