Aryan Khan आज नाही जाणार न्यायालयात; जेलमधून समोर आली मोठी बातमी
आर्यनच्या जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव, पण जेलमधून समोर आली मोठी बातमी
मुंबई : मुंबई रेव्ह पार्टी प्रकरणात, मुंबईच्या विशेष एनडीपीएस कोर्टाने आदल्या दिवशी आर्यन खानच्या जामीन अर्जावर निकाल दिला. सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्याचबरोबर हा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यनच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी आहे, पण आता कारागृह प्रशासनाकडून बातम्या आल्या आहेत की या सुनावणीत आर्यन खान आणि इतर आरोपींना न्यायालयात नेले जाणार नाही.
या प्रकरणात, कारागृह अधिकाऱ्यांनी आर्यन खान आणि इतर आरोपींना आज न्यायालयात नेले जाणार नाही याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा वॉरंटद्वारे सामील होण्याची शक्यता आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत शाहरुखची मॅनेजर आर्यनच्या वकिलांसह उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आर्यन 2 ऑक्टोबरपासून आर्यन तुरुंगात आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख आणि गैरी मुलाला जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत. पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत.दरम्यान, विशेष न्यायालयाने पुन्हा एकदा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकीलाने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आर्यन खानच्या वकिलांनी यासंदर्भात हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. न्यायालय नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळीसाठी 4 नोव्हेंबरला सुट्टीवर जाणार आहे, त्यामुळे जर आर्यन खानला त्या आधी जामीन मिळाला नाही, तर त्याला दिर्घकाळासाठी तुरुंगात राहावे लागेल.