Kangana Ranaut remark against Uddhav Thackeray viral: 'वेळ श्रेष्ठ आहे', असं कायम म्हटलं जातं. कारण, भविष्यात काय लिहिलंय हे कुणालाही ठाऊक नाही, म्हणूनच वर्तमानात बळाचा वापर न करता गोष्टींचा सारासार विचार करतच वागणं कधीही फायद्याचं ठरतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काहीशा अशाच परिस्थितीचा सामना करताना दिसत आहेत. आपल्याच माणसांनी केलेली बंडखोरी पचवत, आमदारांना परत येण्याची भावनिक साद देत अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं शासकीय निवासस्थान, अर्थात वर्षा बंगला सोडला. 


तिथे शिवसेनेच्या अस्तित्वावरच काहींनी प्रश्न उपस्थित केलेला असताना एकनाथ शिंदे यांचा 'आमचा गट हीच खरी शिवसेना' हा राजकीय वादळ नेमकं किती मोठं आहे याचं गांभीर्य दर्शवत आहे. 


या राजकीय धुमश्चक्रीतच आता अभिनेत्री कंगना रानौतचा एक व्हिडीओ आणि तिचे उदगार प्रचंड व्हायरल होत आहेत. 


थोडं भुतकाळात डोकावून पाहिलं असता परिस्थितीचा अंदाज लावणं सोपं होत आहे. 2020 या वर्षी मुंबई महानगरपालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर हातोडा पाडला होता. मेहनतीच्या कमाईतून उभारलेलं तिचं संपूर्ण कार्यालय पालिका कारवाईअंतर्गत उध्वस्त करण्यात आलं होतं.


आपल्याविरोधातील या कारवाईनंतर कंगनाचा संताप अनावर झाला होता. तिनं यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनाच आव्हान देणारं वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरे यांचा अहंकाराचा डोलारा कोलमडेल असं ती म्हणाली होती. 


'तुम्हाला काय वाटतं, तुम्ही चित्रपट माफियांशी हातमिळवणी करत, माझं घर- कार्यालय तोडून मोठा सूड उगवला? आज माझं घर तुटलंय उद्या तुमचा अंहाकार कोलमडेल. हे कालचक्र आहे विसरु नका....', असं कंगना म्हणाली होती. 



कंगनाचा फक्त हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे अशी बाब नाही. तर तिचा आणखी एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे जिथं ती म्हणताना दिसत आहे की, 'जेव्हा कुणी व्यक्ती महिलांचा आदर करु शकत नाही, तेव्हा त्यांचं पतन निश्चित आहे'. 



कंगनाची ही जुनी वक्तव्य आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उदभवलेली सध्याची परिस्थिती पाहता अनेकांनीत या गोष्टी जोडत प्रकणाला नवं वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.