मुंबई : आत्तापर्यंत बरेच सिनेस्टार डीपफेक व्हिडीओचे शिकार झाले आहेत. रश्मिका मंदाना, आमिर खाननंतर रणवीर सिंहचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी सध्या निवडणुकीच्या वातावरणात रणवीर सिंगचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर या व्हिडिओच्या विरोधात आपलं रिएक्शदेखील दिलं आहे आणि लेटेस्ट रिपोर्टनुसार त्याने AI जेनरेटेड डीपफेक व्हिडीओ विरोधात FIR देखील दाखल केली आहे. रणवीरने सायबर क्राईम सेलमध्ये  आपली तक्रार नोंदवली असून गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा तपास सुरू केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही तुम्हाला सांगतो की, रणवीर सिंह नुकताच क्रिती सेनन आणि मनिष मल्होत्रासोबत फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी वाराणसीला पोहोचला होता. या दरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो एका राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ बोलताना दिसत आहे. मात्र, बारकाईने पाहिल्यास व्हिडिओ बरोबर असला तरी ऑडिओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचं लक्षात येईल. या व्हिडिओमध्ये AI च्या माध्यमातून व्हॉईस क्लोनच्या मदतीने त्याचे शब्द बदलण्यात आले आहेत. रणवीरच्या स्पोक्स पर्सनने सांगितलं की, अभिनेत्याने या डीपफेक व्हिडिओविरोधात सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.



डीपफेक व्हिडीओच्या विरोधात रणवीर सिंहने दाखल केली FIR
ऑफिशिअल स्टेटमेंट जारी करत स्पोकपर्सनने सांगितलं की, होय आम्ही रणवीर सिंहच्या डीपफेक व्हिडीओला प्रमोट करणाऱ्या हँण्डलच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
 
रणवीरने सांगितलं, डीपफेकपासून सावधान मित्रांनो
तर रणवीर सिंहने हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने इन्स्टा स्टोरीवर टेक्स्ट शेअर करत लिहीलं की, डीपफेकपासून सावधान मित्रांनो. याचबरोबर त्याने धोक्याचा ईमोजीदेखील शेअर केला आहे.