मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात आणि संपूर्ण जगात काही महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहे. बऱ्याच देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमासुद्धा काही काळापासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. भारतातच्याही आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी हवाई वाहतूकही ठप्प आहे. या सर्व वातावरणात एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्याला त्याच्या मुलाची चिंता वाटू लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोरमा ऑनलाईनच्या वृतत्तानुसार कोरोना व्हायरसहा हा घातक विळखा पाहता, आपल्या मुलाविषयी चिंतातूर असणारा हा अभिनेता म्हणजे विजय. दाक्षिणात्य कलाविश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या विजयचा मुलगा जेसन संजय हा सध्या कॅनडामध्ये आहे. पण, तेथे असणारी एकंदर परिस्थिती पाहता विजयला त्याच्या मुलाच्या आरोग्याची चिंता वाटू लागली आहे. 


जेसन कॅनडातील एका प्रथितयश विद्यापीठात फिल्ममेकिंगचं शिक्षण घेण्यासाठी गेला आहे. मुख्य म्हणजे त्याने यायपूर्वीच एका लघुपटाचं ही दिग्दर्शन केलं आहे. शिवाय येत्या काळात तो तामिळ कलाविश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करण्याचा मान बाळगून आहे. सध्याच्या घडीला मात्र तो जिथे आहे, तिथे अगदी सुखरुतप राहावा अशीच प्रार्थना विजयच्या चाहत्यांनी त्याच्या या मुलासाठी केली आहे. 



 


जगभरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूचं थैमान पाहा.ला मिळत आहे. चीनच्या वुहान प्रांतातून संपूर्ण जगभरात पसरलेल्या या विषाणूचा संसर्ग होणाऱ्यांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. तर, यामध्ये कित्येकांचा मृत्यूही झाला आहे. याच दहशततीच्या वातावरणाचा अंदाज घेत विजयलाही त्याच्या मुलाची चिंता वाटणं स्वाभाविक आहे.