मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आशा नेगी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी, प्रकाशझोकात येण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत प्रवेश करते आणि ती भूमिका उत्तम प्रकारे साकारते. आशा चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. आशा बर्‍याचदा आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. यावेळी आशा तिच्या बोल्ड स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशा खूपच हॉट दिसत आहे
आशा तिच्या स्पष्टवादी स्वभावामुळे इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते. मात्र, चाहत्यांनी तिला फोटोंमध्ये इतकं धाडसी क्वचितच पाहिलं असेल. आशाच्या एका फोटोनं आता सर्वांना तिचं वेड लावलं आहे. या फोटोमध्ये ती खूपच हॉट लूकमध्ये दिसत आहे. आशाने स्वतःच हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.



आशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नुकताच हॉटस्टारने आपल्या नव्या 'कॉलर बॉम्ब' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. 9जुलै रोजी रिलीज होणार्‍या या चित्रपटात जिमी शेरगिल आणि आशा नेगी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या आधी ती नेटफ्लिक्सवरील ऑन लूडो या चित्रपटात दिसली होती.,  आशाने वेब सीरिजमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. बारीश, अभय2, लव का पंगा आणि ख्वाबोके परिंदे यामध्ये आशाने दमदार भूमिका साकारल्या आहेत.