Asha Negi Casting Couch : छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी कास्टिंग काउचचा सामना केला आहे. अनेक सेलिब्रिटींना त्यांना आलेले कास्टिंग काऊचचे खुलासे केले आहेत. अनेक अभिनेत्रींनी सांगितलं की त्यांना काम हवं असेल तर त्यासाठी त्यांना तडजोड करावी लागेल. तर आता या लिस्टमध्ये अभिनेत्री आशा नेगीचं नाव सहभागी झालं आहे. छोट्या पडद्यापासून आता ओटीटीपर्यंत सगळीकडे आशा नेगी तिच्या अभिनयाची जादू दाखवताना दिसते. आशा नेगीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कास्टिंग काउचला घेऊन धक्कादायक खुलासे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशा नेगीनं ही मुलाखत हाउटरफ्लायला दिली होती. यावेळी आशा नेगीनं तिला आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. आशानं हे आठवत सांगितलं की 'त्यावेळी त्यावेळी मी फक्त 20 वर्षांची होती. तेव्हा कॉर्डिनेटर असायचे, जे काम द्यायचे. मी पण एका कॉर्डिनेटरला भेटली होती. त्यानं मला एकटीला भेटायला बोलावलं होतं. खरं सांगायचं झालं तर त्यानं त्याच्या बोलण्यात मला अडकवण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास माझं ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करत होता की असचं होतं आणि तू अशाच प्रकारे पुढे जाशील. त्यानं मला सरळ सांगितलं की अभिनेत्री व्हायचं आहे तर हे सगळं करावं लागणार. कितीही मोठी अभिनेत्री असो, सगळ्यांनी असं केलं आहे, तुलाही असं करावं लागणार.' 



आशा नेगीनं पुढे सांगितलं की कॉर्डिनेटरनं तिला सगळं तडजोड कर असं सांगितलं नव्हतं. पण तिला त्याला काय म्हणायचं आहे ते कळालं होतं. आशानं सांगितलं की मी त्याला म्हणाले जर असं होत असेल तर माझी काही इच्छा नाही. त्यावेळी आशानं आत्मविश्वासनं त्याला उत्तर दिलं, पण खरंतर ती घाबरली होती. आशानं सांगितलं की तिनं सगळं काही तिच्या एका मित्राला देखील सांगितलं पण हे सगळं ऐकूण कोणाला आश्चर्य झालं नाही. आशानं सांगितलं की माझ्या मित्राला सांगितलं, त्यावर तो म्हणाला, हे सगळं होतं. हे खूप नॉर्मल आहे. त्याला थोडंही आश्चर्य झालं नाही. 


हेही वाचा : 'डायबिटीक आहेस का?' कतरिनाच्या हातावरील शुगर ट्रॅक करणारा पॅच पाहताच चाहत्यांनी व्यक्त केली चिंता


आशाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं छोट्या पडद्यावरील पवित्र रिश्तामध्ये पूर्वी देशमुख किर्लोस्करची भूमिका साकारली होती. तिला या भूमिकेमुळे खूप जास्त लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिनं बारिशमध्ये गौरवी करमरकरची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 6 मध्ये दिसली होती आता ती ओटीटीवर दिसते. नुकतीच तिची हनीमून फोटोग्राफर ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. ही सीरिज 27 सप्टेंबर रोजी जियो सिनेमावर झाला. आता या सीरिजमध्ये अंबिका नाथ नावाच्या एका फोटोग्राफरची भूमिका साकारली आहे.