57 व्या वर्षी लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना Ashish Vidyarthi यांनी सुनावलं; म्हणाले, `मला बुड्ढा खूसट...`
Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांना दुसऱ्या लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी यावेळी ट्रोलर्सना एखाद्या व्यक्तीचे वय झाल्यास त्यानं एकटं रहावं किंवा त्यानं स्वत: ला संपवायला हव का? असा सवाल देखील केला आहे.
Ashish Vidyarthi: बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहेत. त्यांनी वयाच्या 57 व्या वर्षी दुसरं लग्न केलं. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्याविषयी चर्चा रंगली होती. त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर कमेंट करत त्यांना ट्रोल करण्यात आलं. या सगळ्या ट्रोलिंगचा आशिष विद्यार्थी यांच्यावर खूप वाईट परिणाम झाला. आता आशिष यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नानंतर त्यांच्यावर होणाऱ्या या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे.
आशिष विद्यार्थी हे गेल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात फॅशन डिझायनर रुपाली बरुआसोबत दुसर लग्न केलं. त्यांची पहिली पत्नी राजोशी विद्यार्थी यांना 2021 साली आशिष विद्यार्थी यांनी घटस्फोट दिला होता. त्यानंतर वयाच्या 57 व्या वर्षी त्यांना दुसरं प्रेम मिळालं आणि त्यांनी वयानं 7 वर्षांनी लहाण असलेल्या रुपाली यांच्याशी लग्न केलं. म्हातारपणात दुसरं लग्न केल्यानं अनेकांनी त्यांना ट्रोल केले. इतकंच काय तर त्यांना म्हातारा आणि खुसट अशा कमेंटही केल्या.
हेही वाचा : सावळ्या रंगावरून Bhau Kadam च्या लेकिचं लक्षवेधी वक्तव्य; एकाएकी चर्चांना उधाण...
आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यावर सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्यापैकी कोणीही अशा प्रकारच्या कमेंट इतरांवर करत आहोत, मी आपल्याविषयी अनेक अपमानकारक गोष्टी ऐकल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोक माझ्याविषयी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. ते लोक जे बोलत आहेत ते सुद्धा एक दिवस या अवस्थेचा सामना करतील. जर कोणत्या व्यक्तीचं वय जास्त आहे तर त्यानं काय दु: खी होऊन मरायला हवं. एका म्हाताऱ्या व्यक्तीला आनंदी राहण्याचा अधिकार नाही. एका वयस्कर व्यक्तीला वाटत नाही का की त्यांचा एकसाथीदार असायला हवा.
आशिष पुढे म्हणाला, आपण लोकांसाठी काय उदाहरण ठेवत आहोत. कायद्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती, जो नेहमी वेळच्या वेळी टॅक्स पे करतो. जो पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत करतो. जर ती व्यक्ती कायद्याप्रमाणे विवाह बंधनात अडकत असेल तर त्यात लोकांना काय अडचण आहे. ही एक अशी गोष्ट आहे ज्यात सगळ्यांना एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे किंवा पाठिंबा दिला पाहिजे नाकी त्यांचे पाय धरून खाली पाडायला हवे. आज जेव्हा लोक माझ्याविरोधात कमेंट करत आहेत तेव्हा मला आश्चर्य होत आहे.
द टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत आशिष म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी रुपाली यांनी त्यांच्या पतीला गमावले. त्यांनी दुसऱ्यांदा लग्न करण्याविषयी कोणातीही विचार केला नव्हता. पण जेव्हा त्यांची आणि माझी भेट झाली तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही दोघं आनंदी राहु शकतो