Shark Tank India : शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India) दुसऱ्या सीझनमध्ये भारत पेचे माजी सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) नसणार आहेत. दुसऱ्या सीझनमध्ये ते दिसणार नसल्याने चाहत्यांची निराशा झाली होती. त्यात आता अश्नीर ग्रोव्हर दुसऱ्या सीझनमध्ये का नसणार आहे, याचे कारण समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) याचे दोगलापण हे आत्मचरीत्र येत आहे. या आत्मचरीत्राबाबत ते रेड एफएमशी बोलत होते. यावेळी त्यांना शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India) दुसऱ्या सीझनमध्ये का सहभागी होत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर ते म्हणाले की, त्यांना मी परवडत नाही. परवडणे हे केवळ पैशामुळेच होत नाही, तर ते स्थितीमुळेही असते,असेही त्यांनी सांगितले. 


...तरच बिग बॉसमध्ये जाणार


अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) बिग बॉसमध्ये (Big Boss) शोमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने बिग बॉस शो आता शिळा झाल्याचे म्हटले आहे.तसेच जर त्याला शोचा होस्ट सलमान खानपेक्षा (Salman Khan) जास्त पैसे मिळाले तर तो बिग बॉसमध्ये जाण्याचा विचार करू शकतो, असेही त्याने म्हटलेय. बिग बॉस शो बाबत पुढे बोलताना तो म्हणाला की, जी लोक अपयशी ठरतात, ते या शोमध्ये जातात. तसेच त्याला या शोसाठी विचारण्यात आले होते, मात्र त्याने नकार दिला होता, असा खुलासा देखील त्याने केला. 
 
शार्क टँक इंडियाचा (Shark Tank India) दुसरा सीझन लवकरच सुरु होणार आहे. या सीझनमध्ये शादी डॉट कॉंमचे (Shadi.com) सीईओ अनुपम मित्तल, बोटच अमन गुप्ता,  Emcure फार्मास्युटिकल्सची नमिता थापर, आणि शुगर कॉस्मेटिक्सच्या सह-संस्थापक आणि सीईओ विनिता सिंग दिसत आहेत. तर या सीझनमध्ये CarDekho.Com चे सह-संस्थापक सीईओ अमित जैन यांचा या शोमध्ये समावेश करण्यात आला आहे. अश्नीर ग्रोव्हर आणि मामाअर्थची संस्थापक गझल अलघ यावेळी शार्क टँक इंडिया शोचा (Shark Tank India) भाग नसणार आहेत.