मुंबई : बॉलिवूडमध्ये काही हिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेता बॉबी देओल बरेच दिवस बॉलिवूडपासून लांब होता. पण सध्या तो खूपच चर्चेत आहे. आश्रम या वेब सीरीजमध्ये त्याची भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे. ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉबी देओलची कारकीर्द पुन्हा रुळावर आली आहे. या वेब सिरीजचा तिसरा सीझन आला आहे जो खूप लोकप्रिय झालाय. तिसर्‍या सीझनमध्ये निर्मात्यांनीही भरपूर मसाला टाकला आहे आणि लोकांना तो खूप आवडला आहे. जेव्हा लोकांना दोन सीझन खूप आवडले, तेव्हा निर्मात्यांनी त्याचा तिसरा भाग रिलीज केला.


या भागात खूप बोल्ड सीन्स पाहायला मिळत आहेत, त्यामुळे अभिनेत्री ही खूप चर्चेत आहेत. अभिनेत्री अनुरिता झा हिने आश्रम 3 मध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. नुकतीच अभिनेत्री अनुरिता हिने एक मुलाखत दिली, त्या दरम्यान अभिनेत्रीला एक प्रश्न विचारण्यात आला, तिला विचारण्यात आले की तिच्या बोल्ड सीनमुळे तिच्या कुटुंबावर काय परिणाम होतो. याबाबत अभिनेत्री म्हणाली की, सर्वजण अनुरीताची स्तुती करताना दिसत आहेत, तर घरातील सदस्यही तिची प्रशंसा करत आहेत.


आश्रम 3 रिलीज होण्याआधीच अभिनेत्रीची मुलाखत घेण्यात आली होती, या मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आले की तिने आश्रम 3 मध्ये खूप बोल्ड सीन देण्यासाठी आधीच घरातील सदस्यांची परवानगी घेतली होती का? यावर अनुरिता म्हणाली की, मला या वेब सीरीजमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यावर सर्वप्रथम मी माझ्या वडिलांना फोन केला आणि वडिलांना सांगितले की, मला या सीनमध्ये अशा भूमिका दिल्या जात आहेत, मी करू की नाही. यावर माझे वडील म्हणाले हो हो नक्की कर, तू या मालिकेत काम करू शकतेस.


जेव्हा मी माझ्या वडिलांकडून या गोष्टी ऐकल्या तेव्हा मला खूप छान वाटले कारण जेव्हा मला माझ्या वडिलांची परवानगी मिळते. तेव्हा कशाचीही भीती नसते. त्यानंतर मी या वेब सीरीजमध्ये काम केले आणि खूप बोल्ड सीन्स दिले. इतकंच नाही तर अनुरिताने प्रकाश झा यांचेही खूप कौतुक केले आहे.