`बाबा निराला` पुन्हा येतोय... `आश्रम 3`चा जबरदस्त मोशन व्हिडिओ रिलीज
आश्रम 3 वेब सिरीजचा मोशन व्हिडिओ रिलीज झाला आहे. हा मोशन व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर या वेब सीरिजबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
मुंबईः आश्रम-3 वेब सिरीजचा मोशन व्हिडिओ रिलीज झाला आहे. हा मोशन व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर या वेब सीरिजबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
बॉबी देओलच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'आश्रम 3' चा मोशन व्हिडिओ रिलीज झाला आहे. या व्हिडिओमध्ये सीझन 3 चा लोगो स्पष्टपणे दिसत आहे. मागील पार्श्वभूमीत आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. हा मोशन व्हिडिओ रिलीज होताच या वेब सीरिजच्या तिसऱ्या भागाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.
हा मोशन व्हिडिओ ईशा गुप्ता आणि बॉबी देओलने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यानंतर चाहते सातत्याने या मोशन व्हिडिओवर कमेंट करत आहेत.
'आश्रम 3' वेब सिरीज कधी रिलीज होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र हा मोशन व्हिडिओ रिलीज होताच चाहत्यांना आश्रम वेब सीरिजचा तिसरा भाग लवकरच पाहायला मिळणार हे निश्चित आहे.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता संदीपने सांगितले होते की, शूटिंग आणि डबिंगचे काम पूर्ण झाले असून लवकरच नवीन सीझन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची अशी भूमिका साकारली की तो लोकांच्या मनात घर करून गेली. या वेब सिरीजची कथा काशीपूर या काल्पनिक शहरावर आधारित आहे. बाबा लोकांना आश्रमाशी जोडण्यासाठी कसे प्रवृत्त करतात हे वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. या वेब सिरीजची कथा ड्रग्ज, बलात्कार आणि राजकारणाभोवती फिरते.
प्रकाश झा यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.