मुंबई : #MeToo या अभियानात सहभागी झालेल्या अभिनेत्रीवरच लैंगिक अत्याचाराचा आरोप लावण्यात आला आहे. हॉलिवूडची अभिनेत्री - दिग्दर्शक अर्जेंटोवर एका बाल कलाकाराने लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. या माजी बाल कलाकाराने गेल्यावर्षी अभिनेत्रीवर आरोप लावला होता की, जेव्हा तो 17 वर्षांचा होता तेव्हा अभिनेत्रीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार अर्जेंटोने या बाल कलाकार - संगीतकार जिम्मी बेन्नटशी 3,80,000 डॉलरमध्ये तडजोड केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या बाल कलाकारने दावा केला होता की, 2013 मध्ये कॅलिफोर्नियाच्या एका हॉटेलमध्ये 37 वर्षाच्या अभिनेत्रीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. तेव्हा त्याने 17 वर्षे पूर्ण केली होती. पण 18 वर्षे पूर्ण न झाल्यामुळे त्या नियमांत तो बसत नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार अर्जेंटोच्या वकिलांनी सांगितलं की, एवढे पैसे बेन्नटला मदत म्हणून देखील दिले असतील. तसेच 2013 मध्ये हॉटेलमध्ये नक्की काय झालेलं याचा उल्लेख देखील केला होता. अर्जेंटोने त्या दिवशी उपस्थित लोकांना जाण्यास सांगितलं. तिला बेन्नटसोबत काही काळ एकट्यात घालवायचा होता. त्यानंतर तिने त्याला अल्कोहल दिलं. काही नोट्स दाखवले. त्यानंतर त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर बेन्नटला असंख्य फोटो घेण्यास सांगितले. 


त्यानंतर एशियाने या दोघांचे क्लोज - अप फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. त्यानंतर तिने असं देखील सांगितलं की, ती बेन्नटला आपल्या आगामी सिनेमांत काम देखील देणार. या सर्व गोष्टी या प्रकरणात पुरावा म्हणून सादर केले आहे. यानंतरच या दोन्ही पक्षात सेटलमेंट झाली. आश्चर्याची बाब म्हमजे गेल्यावर्षी हॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या #MeToo कॅम्पेनमध्ये अर्जेंटोचा देखील समावेश होता.