मुंबई : अभिनेता शाहरूख खानने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे. 'झिरो' चित्रपटानंतर तो अभिनयाकडे फिरकलाच नाही. शिवाय त्याचा 'झिरो' चित्रपट देखील चाहत्यांचे मनोरंजन करण्यास अयशस्वी ठरला. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करत आहे. तर कधी चक्क घरातलं वाचनालय स्वच्छ करताना दिसत आहे. जेव्हा अभिनेत्री दीपिका पादुकोनला माहित झालं की किंग खान कामात व्यस्त आहेत. तेव्हा तिने शाहरूखला मेसेज करून लक्षात आणूण दिले की 'तुम्ही मला फोन करणार होते...'



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरूखने ट्विटरवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचे केस विखूरलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शन मध्ये 'पूर्ण रात्र वाचनालय साफ करण्यात गेली...पुस्तकांवर लागलेली धुळ, आनंद आणि बरचं काही' असं लिहिलं आहे. 


त्याच्या या पोस्टवर दीपिकाने प्रतिक्रिया दिली आहे. 'तू तर मला फोन करणार होतास' अशी ती म्हणाली. दीपिकाने 'ओम शांती ओम' या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरूख सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ही जोडी 'चेन्नई एक्सप्रेस', 'हॅप्पी न्यू ईअर' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र झळकली. 


दीपिका लग्नानंतर 'छपाक' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. त्याचप्रमाणे ती '८३' चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे.