‘काही दिवस लोकं सेल्फीसाठी विचारण्याची हिम्मत करणार नाहीत’
चाहत्यांच्या प्रतिक्रिया...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेते परेश रावल सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अभिनय ते राजकारण असा प्रवास करणारे परेश रावल कायम सामाजीक मुद्द्यांवर आपले विचार मांडत असतात. नुकाताच त्यांनी केलेला एक ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवस लोकं सेल्फीसाठी विचारण्याची हिम्मत करणार नाहीत असं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटवर चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
परेश रावल ट्विटमध्ये म्हणाले की, 'काही दिवस लोकं सेल्फीसाठी विचारण्याची हिम्मत करणार नाहीत...' कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं ट्विट केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. व्हायसरचा संसर्ग थांबवण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे.
परंतु एका चाहत्याने तर सेल्फीस्टीकने फोटो काढण्याचा उपाय सुचवला आहे. परेश रावल यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या भूमिकांना न्याय दिले आहे. विनोदी भूमिका साकारून त्यांनी चाहत्यांना पोट धरून हासण्यास भाग पाडले तर कधी खलनायकाच्या भूमिकेमुळे चाहत्यांच्या मनात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
परेश रावल ‘हंगामा २’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि जावेद जाफरीा मुलगा मीजन जाफरी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.