मुंबई : अमेरिकेच्या मॅनहॅटन परिसरात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिलाय. मंगळवारी एका हल्लेखोराने ट्रकच्या माध्यमातून काही लोकांनी चिरडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात ८ जणांना मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. न्यूयॉर्कच्या गव्हर्नरने हा दहशतवादी हल्ला म्हटले आहे. 


ट्रकने काही लोकांना चिरडल्यानंतर हल्लेखोर दोन्ही हातांमध्ये बंदुक घेऊन खाली उतरला आणि जोरजोरात ओरडू लागला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो बेशुद्ध झाला. त्याच्या पोटात एक गोळी लागली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्याकडे आढळलेल्या बंदुका या नकली असल्याचे नंतर समोर आले. 



या हल्ल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने एक ट्विट केले आहे. ती म्हणाली की, ‘ही घटना फारच धक्कादायक होती. कारण जिथे ही घटना घडली त्या जागेपासून जवळच माझं घर आहे’.



प्रियंका सध्या ‘क्वांटिको’च्या तिस-या सीझनच्या शूटिंगसाठी अमेरिकेत आहे. आपल्या चाहत्यांना हॅलोवीनच्या शुभेच्छा देणारे ट्विट केल्यानंतर काही वेळातच तिने हल्ल्यासंबंधी ट्विट केले. ज्यात तिने ही माहिती दिली.