Avinash Tiwary and Amitabh Bachchan :  बॉलिवूड अभिनेता अविनाश तिवारीच्या खाकी या सीरिजमध्ये आणि बूलबूल या चित्रपटात त्यानं साकारलेल्या भूमिका तर चांगल्याच चर्चेत ठरल्या होत्या. अलीकडेच 'युद्ध' सीरिजमध्ये दिसला होता. या सीरिजमधील त्याच्या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा बनवली आहे. या सीरिजमधील एका सिन बद्दल अविनाश तिवारीनं एक आठवण शेयर केली आहे. ज्यामध्ये तो अमिताभ बच्चनसोबत काम करत होता. अविनाश तिवारीने सांगितले की शूटिंग दरम्यान त्याने चुकून अमिताभ बच्चन यांच्या डोक्याला मारले, ज्यामुळे ते घाबरले. ही घटना 2014 मध्ये घडली होती आणि अविनाश तिवारीनं आता ही गोष्ट शेअर केली आहे.अविनाश तिवारीचा पहिला अॅक्शन सीक्‍वेन्‍स 2013 मध्‍ये 'युद्ध' या सीरिजसाठी अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता. त्यानं हा अनुभव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेअर केला आहे. 


अमिताभ यांच्यासोबत अॅक्शन सीन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अविनाश तिवारी म्हणाले, 'आयुष्यातील माझा पहिला अॅक्शन सीक्‍वेन्स अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता. मी स्टंटमॅनसोबत सराव करायचो. पण बच्चन सरांना रिहर्सलची गरज नव्हती कारण ते आयुष्यभर हे करत होते. जेव्हा शॉट होता तेव्हाच ते आमच्यात सामील व्हायचे. त्यांनी माझ्यासोबत स्टंट केला तेव्हा ते 72 वर्षांचे होते. त्यांचा पाय माझ्या डोक्यावरून गेला. मी 6 फूट उंच आहे, आणि हे सर्व थक्क होण्यासारखं होतं.'


अमिताभ यांना चुकून मारले कोपरानं...


अमिताभ बच्चन यांना चुकून मारल्याबाबत अविनाश तिवारी म्हणाले की, 'त्या अॅक्शन सीक्वेन्समध्ये मी चुकून कोपराने त्यांच्या डोक्याला मारले. माझ्याकडे त्याचा एक व्हिडिओ आहे. सेटवरील प्रत्येकजण मला चिडवत होता की आता मला भविष्यात कोणतीच फिल्म मिळणार नाही आणि तेव्हा मला माझे करिअर संपल्यासारखे वाटले.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या घटनेनंतर सेटवर पूर्ण शांतता पसरल्याचे त्याने स्पष्ट केले. दिग्दर्शकाने कट करण्यासाठी कॉल केला नाही, म्हणून त्याने सीन सुरू ठेवला. अविनाशनं आणखी एक फाईट मारली, पण सुदैवाने अमिताभ बच्चन जखमी झाले नाहीत. शॉटनंतर, तो अमिताभ यांची माफी मागायला गेला, तेव्हा ते म्हणाले की हो, तू माझ्या डोक्यावर मारले आणि या भितीत मी त्यांना विचारलं की सर, आणखी एकदा रिहर्सल करू या? त्यांनी सगळ्यांकडे पाहिले आणि मला उद्देशून म्हणाले कुठुन आणलाय याला? आणि लगेचच म्हणाले, 'चल, पुन्हा एकदा रिहर्सल करू' 


हेही वाचा : ...म्हणून मी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या, पण आम्हाला मूल नकोय कारण...; प्रार्थना बेहरेचं विधान


'युद्ध' ही सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज आहे.या सीरिजचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता आणि दिप्ती कलवानी यांनी केले. हा शो अनुराग कश्यपनं तयार केला होता. दुसरीकडे अविनाश तिवारी अलीकडेच 'काला' आणि 'बंबई में का बा' सारख्या वेब सीरिजमध्ये दिसला आहे.