अवघ्या 20 वर्षांच्या अभिनेत्रीचे Nawazuddin Siddiqui रोमँटिक सीन, यावर ती म्हणते....
`कोणत्याही वयाच्या व्यक्तीसोबत रोमँटीक सीन करण्यासाठी मला...`, नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रोमाँटिक सीन देणाऱ्या अभिनेत्रीचं वक्तव्य
मुंबई : सिनेमाची गरज म्हणून आणि तो सिनेमा सत्य वाटावा म्हणून दिग्दर्शक प्रचंड प्रयत्न करतो. प्रेम, ब्रेकअप, बोल्ड सीन इत्यादी गोष्टी करण्यासाठी अभिनेते आणि अभिनेत्री देखील तयार होतात. आता 'टीकू वेड्स शेरु' सिनेमातून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी 20 वर्षांच्या अभिनेत्रीसोबत रोमँटिक सीन करताना दिसत आहे. नवाजुद्दीनसोबत रोमँटीक सीन करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सोशल मीडिया सेन्सेशन अभिनेत्री अवनीत कोर आहे.
वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी अवनीतने 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर' शोतून करियरची सुरूवात केली. त्यानंतर तिने 'मास्टर' सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. त्यानंतर 'करीब करीब सिंगल' आणि 'मर्दानी' सिनेमात देखील तिने सहाय्यक अभिनेत्री भूमिका साकारली.
आता ती 'टीकू वेड्स शेरु' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात अवनीत तिच्या वयाच्या दुप्पट असलेल्या अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. यावर अवनीत म्हणते, 'कोणत्याही वयाच्या व्यक्तीसोबत रोमाँटीक सीन करण्यासाठी माझी काही हरकत नाही...'
रोमाँटीक सीन बद्दल अभिनेत्री म्हणते, 'स्त्री आणि पुरूष कलाकारांच्या वयातील असलेल्या अंतरात मला काही हरकत नाही. रोमाँटीक सीन याआधी देखील अनेक वेळा शूट झाले आहेत..'
'सिनेमा पाहिल्यानंतर कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक होतं... कंगना मॅमने आधीचं सांगितलं होतं बोल्ड सीन सिनेमाची गरज आहे... आणि त्यांना मी होकार दिला..'
सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेत्री कंगना रानौतच्या खांद्यावर आहे. सीनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.