मुंबई : अयोध्यामध्ये राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला. अनेक वर्षांनंतर या शुभ प्रसंगी प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या भावना व्यक्त करत आहे. या निमित्ताने बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजनपर्यंतच्या स्टार्सनी अनेक पोस्ट्स केल्या आहेत. आज अयोध्येत भगवान श्री रामाचा प्राण प्रतिष्ठासोहळा सुरु असून  हे मंदिर सामन्य जनतेसाठी खुले होणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याला केवळ राजकिय नेतेच नाहीतर सेलिब्रिटीदेखील हजर होते. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी बागेश्वर बाबा अयोध्येत पोहोचले. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "हा भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे... ही रामराज्याची सुरुवात आहे. माझं मन भरून आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भव्यदिव्य सोहळ्याला देशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी अभिनेत्री कंगना राणौत एक दिवस आधी अयोध्येत पोहोचली आहे. ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथल्या अपडेट्स सतत तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत आहे.  इतकंच नाहीतर कंगना अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याव्यतिरिक्त ती इतर धार्मिक विधींमध्ये भाग घेत आहे. त्यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांची भेट घेतली. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचीही भेट घेतली. 


सोशल मीडियावर सक्रिय असणारी कंगनाने इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती बागेश्व बाबांसोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहीलं आहे की, "मी पहिल्यांदा माझ्या वयापेक्षा लहान गुरुजींना भेटले, ते माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत, मला त्यांना लहान भावाप्रमाणे मिठी मारवं असं वाटत होतं." पण नंतर काही वयाची आठवण झाली. शब्दाने गुरू होत नाही तर कृतीने गुरु होतो. गुरुजींचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले. जय बजरंगबली." असं कॅप्शन अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे. 


रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला जाण्याआधी बागेश्वर बाबांनी आजतकशी बातचित केली. यावेळी बोलताना बागेश्वर बाबांनी दावा केला की, आता राम राज्य आलंय. आता श्री गणेशा झाला आहे. देशात यावेळी राममयाचा माहोल सुरु आहे. अशातंच जो रामाचा भक्त आहे तो सोबत चालणार. आणि जो नाहीये तो कोणाचाच नाही. प्रत्येक भारतीयांच्या नसा नसात प्रभू श्रीरामाचे रक्त सळसळत आहे.