मुंबई : नुकताच रिलीज झालेला ड्रीम गर्ल 2 ट्रेलर खूप चर्चेचा विषय ठरतोय. प्रेक्षकांनी ही या ट्रेलरला खूप पसंती दिली आहे. सगळ्या लोकांकडून या ट्रेलरला प्रेम भेटत आहे. आता, बिहारच्या समस्तीपूर पोलिस युनिटने आयुष्मानचे त्याच्या ड्रीम गर्ल अवतारसाठी कौतुक केलं आहे आणि आयुष्मानने चित्रपटातील पूजा या पात्राच्या भूमिकेत त्यांना सायबर फसवणूकीचा प्रसार करण्यास कशी मदत केली याबद्दल सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी आयुष्मानला टॅग केलं आहे आणि ट्विट केलं आहे: ''या चित्रपटातील तुमचा लूक सायबर फसवणुकीविरुद्धच्या आमच्या लढ्यात आश्चर्यकारकपणे आकर्षक असल्याचं सिद्ध झालं आहे. तुमची कृती वास्तविक सायबर फ्रॉड कॉलच्या अगदी जवळ होती. कृपया अशीच जनजागृती करत रहा. शुभेच्छा आणि समस्तीपूरमध्ये आपलं स्वागत आहे.''


आयुष्मान खुरानाने आज भारतात कंटेंट सिनेमाचा पोस्टर बॉय म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याच्या ब्लॉकबस्टर सोशल एंटरटेनर्सनी निषिद्ध विषय उघडपणे सार्वजनिक चर्चेसाठी आणले आहेत आणि आता समस्तीपूर पोलिसांनी त्याचं कौतुक केलं आहे.


ड्रीम गर्ल 2 चित्रपट मनोरंजन करणारा आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांच्या मानसिकतेत एक मोठं प्रबोधन करणारा ठरेल. हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे आणि तो नक्कीच ब्लॉकबस्टर ठरणार आहे यात काहीच शंका नाही.'



अभिनेता आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच  मुंबईतील मेटा ऑफिसमध्ये लाँच करण्यात आला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक राज शांडिल्य म्हणाले की, 'ड्रीम गर्ल 2' 2021 साली येणार होता, पण कोविडमुळे चित्रपट लांबणीवर पडला होता, पण आता 'ड्रीम गर्ल 3' लवकरच सुरू होईल.


बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आयुष्मान खुरानाचे अनेक चित्रपट असे केले आहेत ज्यातून समाजाल एक मेसेज देता येईल. त्यात अनेक चित्रपट आहेत. दरम्यान, आयुष्मान खुरानाचा एक चित्रपट आहे जो पाहून सगळ्यांना हसू अनावर होतं आणि तो चित्रपट म्हणजे 'ड्रीम गर्ल'. 'ड्रीम गर्ल' या चित्रपटानं सगळ्यांना वेड लावलं होतं. आता सगळ्यांची ड्रीम गर्ल म्हणजेच पूजा आता 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येणार आहे.