Ayushmann Khurrana Dil Dil Pakistan song : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आयुष्मान खुराना हा 'दिल दिल पाकिस्तान' हे गाणं गाताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी तर हे देखील सांगितलं की तो राम मंदिर पाहिल्यानंतर दु:खी झाला होता. त्यामुळे आता पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव करतोय. या व्हिडीओ मागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जूना आहे. त्यातील काही भाग सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण जेव्हा तुम्ही हा व्हिडीओ पाहाल तेव्हा तुम्हाला हे प्रकरण कळेल. हा व्हिडीओ 20 नोव्हेंबर 2017 रोजी हा व्हिडीओ कोणत्याही व्हेरिफाइड यूट्यूह चॅनल Selfie Tv वर अपलोड करण्यात आला आहे. त्याचं टायटल होतं. आयुष्मान खुराना दुबईमध्ये पंजाबी सिंगिंग करत आशियातील देशांना ट्रिब्यूट देत होता. या व्हिडीओत आयुष्मानला वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये पंजाबी, उत्तर प्रदेश, बंगाली आणि दक्षिण भारताच्या लोकांना ट्रिब्यूट दिला आहे. या दरम्यान, आयुष्मान खुराना हा भाऊ आपरशक्ती खुरानासोबत स्टेजवर 'दिल दिल पाकिस्तान' आणि 'चक दे इंडिया' ही गाणी परफॉर्म केली. 



हा कार्यक्रम दुबईत झाला. सुरुवातीला आयुष्मान आणि अपारशक्ति दोघे बॉलिवूडची गाणी गाताना दिसले. त्यानंतर ते दोघं पंजाबी, यूपी, बंगाली आणि दक्षिण भारताच्या लोकांचं नाव घेत त्यांची गाणी गात होते. त्यानंतर ते म्हणतात, आणि हे पाकिस्तानी मित्रांसाठी आहे. त्यानंतर ते 'दिल दिल पाकिस्तानी, जान जान पाकिस्तान' गाण गाताना दिसले. त्यानंतर आयुष्मान खुराना संपूर्ण भारतासाठी 'चक दे इंडिया' गाणं गाताना दिसला. 



गल्फ न्यूजमध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, आयुष्मान खुराना आणि पाकिस्तानी अभिनेता अली जफर 27 ऑक्टोबर 2017 रोजी दुबईत ड्यूटी फ्री टेनिस स्टेडियममध्ये एकत्र परफॉर्म करत होते.


हेही वाचा : 'अपयशी होण्याची भीती...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चनची बोलकी पोस्ट


आयुष्मान 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होता. त्याच्याशिवाय विकी कौशल, कतरिना कैफ, आलिया भट्ट, रणबीर कपूरसोबत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.