गायकाच्या मुलाचा जन्मतःच मृत्यू; `एवढ्याशा चिमुकल्याचा एवढा भार...` म्हणत व्यक्त केली भावना, पत्नीला सांभाळणं...
गायक बी प्राक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बी प्राकची गाणी कायमच चाहत्यांच मनोरंजन करत असतात. पण आता बातमी आहे ती त्याच्या खासगी आयुष्याबद्दल. बी प्राकच्या नवजात बालकाचा जन्मः होताच मृत्यू झाला आहे.
पंजाबी गायक बी प्राक सध्या बॉलिवूडमध्ये खूप चर्चेत आहे. बॅक टू बॅक हिट गाण्यांमुळे गायकचा फॅन फॉलोईंगमध्ये झपाट्याने वाढ झाली आगे. गेल्या काही दिवसांपासून त्याने दिलेल्या हिट गाण्यांमुळे संगीत क्षेत्रात त्याने स्वतःच नाव कमावलं आहे. बी प्राक कायमच लेखक जानीसाठी गाणं गाताना दिसतो. या दोघांची जोडी अतिशय खास आहे. एवढं यश संपादन करुनही बी प्राक अत्यंत नम्र असल्याचं दिसून येतो. त्याला अनेकदा वृंदावानत कृष्णाची मनापासून भक्ती करताना अनुभवलं आहे. पण बी प्राकचं जीवन अतिशय संघर्षाने भरलेलं आहे. त्याने आपल्या खासगी जीवनात अनेक कठिण प्रसंगांचा सामना केला आहे. या सगळ्या परिस्थितींना तो खूप खंबीरपणे सामोरे गेला आहे. नवजात मुलाच्या जन्माचं दुःख त्याने सर्वांसमोर व्यक्त केला आहे.
बी प्राकच्या आयुष्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
अलीकडेच शुभंकर मिश्रासोबतच्या एका पॉडकास्टमध्ये बी प्राकने त्यांच्या आयुष्याविषयी सांगितले. बी प्राक याने त्याचा अध्यात्माकडे कल कसा वाढला हे सांगितले. 2021 चा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, त्यांच्या काकांचे निधन झाले आणि काही महिन्यांनंतर त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. या सगळ्यातून तो कसा तरी सावरला पण त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना 2022 मध्ये घडली. आपल्या नवजात मुलाला त्याच्या जन्मानंतर अवघ्या तीन दिवसांनी गमावले. याविषयी बोलताना बी प्राक याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी या मुलाखतीत या घटनेनंतर पत्नीला कसे सांभाळले हे देखील सांगितले आहे. तसेच आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल पत्नीला सांगणे ही सर्वात कठीण गोष्ट होती, यावेळी त्याने त्या प्रसंगातील कटू आठवणी जागवल्या.
गायकाने व्यक्त केली भावना
गायक बी प्राक म्हणाला, 'मीराला (माझ्या पत्नीला) कसे समजवायचे ते समजत नव्हते. मी तिला सतत सांगत राहिलो की, डॉक्टर अजून बाळाला बघत आहेत आणि तपासत आहेत, काळजी करू नकोस. मी तिला सतत सांगत होतो की, बाळ NICU मध्ये आहे. कारण मी खरे सांगितले असते तर ती सहन करू शकली नसती. पुढे बी प्राकने आपल्या मुलाच्या अंत्यसंस्काराची वेळही आठवली आणि तो क्षण त्याच्यासाठी किती भारी होता हे देखील सांगितले. तो म्हणाला, 'इतक्याशा चिमुकल्याचं एवढं वजन' ही आयुष्यातली सगळ्यात मोठी जड गोष्ट होती आणि जेव्हा मी दवाखान्यात परत आलो तेव्हा मीरा रूममध्ये आली होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तू मला दाखवायला हवं होतंस. मी तिला बाळाला दाखवले नाही म्हणून आजपर्यंत ती माझ्यावर रागावला आहे. तो पुढे म्हणाला की, मला वाटले की, मी त्याला दाखवले असते तर सर्व काही संपले असते.