COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सिनेमातील अभिनेत्यांशी आपण बोलाव अस त्यांच्या चाहत्यांना नेहमी वाटतं असतं. सिनेमादरम्यान स्टार्सच्या संपर्क नंबरची काही हिंट मिळतेय का? हे सर्वजण शोधत असतात.


सिनेमातूनही असे नंबर समोर आणले जातात.


जॉली एलएलबी सिनेमात जॉली असलेल्या अक्षय कुमारच्या गाडीवरही मोबाईल नंबर दिसला. अनेकांनी त्या नंबरवरही कॉल करण्याचा प्रयत्न केला.


पण तो नंबर भलत्यालाच लागला. असाच काहीसा प्रकार बागी २ सिनेमाच्या बाबतीत घडलाय.


बागी २ चा ट्रेलर लॉन्च झालाय. यामध्ये एक मोबाईल नंबरही देण्यात आला. अनेकांनी यावर फोन करण्याचा प्रयत्न केला.


हा आहे नंबर 


 ७०६९४४५५५५  नंबर ट्रेलरमध्ये दिसतोय. ट्रेलर पाहिल्यावर अनेकांनी या नंबरवर कॉल केला. पण त्यांनी रिस्पॉन्स काय मिळाला ? उत्तर काहीच नाही. खरच. काहीच प्रतिसाद मिळाला नाही. 


गुजरातमधील नंबर 


फोन लावल्या लावल्या कट होतो. ट्रू कॉलरवर चेक केल्यावर हा नंबर बागी २ नावाने सेव्ह असलेला सापडतो.


पुढे जाऊन नंबर ट्रेस केल्यावर कळतं की तो वोडाफोनचा असून गुजरातमधील आहे. आतापर्यंत ११ वेळा या नंबरचे स्पॅम रिपोर्ट केला गेलाय.