COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : बाजी या झी मराठीच्या नवख्या मालिकेच्या २२ ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात बिनीवाले पासून झाली. बिनीवाले गावकऱ्यांच्या नजर चुकवून कसाबसा घाबरल्यावस्थेत शेरा लपलेल्या ठिकाणी पोहचतो आणि शेराला पुणे सोडून जाण्याचा सल्ला देतो व कोतवालाने नगरातील सर्व म्हाताऱ्यांना कैद करण्याचे सक्त आदेश दिले आहे असेही सांगतो. बिनीवाल्याची बडबड चालूच असते एवढ्यात शेराचा पाळलेला विंचू बिनीवाल्याच्या खांद्यावर पडतो आणि त्याच्या पाय खालची जमीन सरकते. कळवळून विनंती केल्यावर बिनीवाल्याला शांत राहा असे सांगून शेरा आपल्या विंचवाला तलवारीच्या मदतीने हातात घेतो आणि बिनीवाले सुटकेचा निःश्वास टाकतो. तेव्हा शेरा म्हणतो मी कधीच कुणाला घाबरत नाही आणि जोवर हार चोरणारा आणि त्याचा त्यामागचा उद्देश कळत नाही तोवर मी माझ्या मूळ कामाला सुरुवात करणार नाही असे शेरा बिनीवालेला सांगतो.


तेव्हा त्या खेळणीवालीने बाजीला वाचवले असे बिनीवाले शेराला सांगतो. ते ऐकून शेरा म्हणतो जर खेळणीवालीने हार चोरला मग तिने बाजीला का वाचवले व त्याच विचारात हरवून जातो? दुसरीकडे बावन्न खणीतून मावळे सर्व म्हाताऱ्यांना पडकून कोतवालीत घेऊन जातात, त्यांना बघून चिंताग्रस्त झालेल्या चंद्राला शेवंता शेराने घातलेल्या हैदोसाबद्दलची माहिती देते. परशा मारून शिलेदारा घाव करणारा शेरा आता शिलेदाराच्या तावडीतून वाचत नाही. असे ऐकता चंद्रा म्हणते, तो पकडला गेला तर सर्वात जास्त आनंद मला होईल आणि हिरावरचे ग्रहण टळून जाईल. तो शेरा हिराला काही मोबदला न देता घेऊन जाईल असेही पुढे चंद्रा बोलते, तेवढ्यात तिथे हिरा येथे आणि चंद्राच्या चेहऱ्यावरील रंग उडून जातात. पण जवळ येऊन हिरासुद्दा शेराचा शोध चालू आहे हीच बातमी देते. दरम्यान चिचोक्या हिराला म्हणतो माझा आज्या अजून कसा आला नाही, त्याला काही झाले तर नसेन ना. चिचोक्याची अवस्था बघून हिरा त्याला घेऊन आज्याला शोधायला कोतवालीत जाते. कोतवालीत गेल्यावर हिरा बाजीला म्हणते आता तुमची तब्बेत कशी आहे? ते ऐकून दादाजी म्हणतात, हे तुला कसं कळलं?


तेव्हा गडबडलेली हिरा म्हणते मी चेहऱ्यावर ओळखले. मग तिच्या मागून चिचोक्याही म्हणतो की आमच्या अक्काला चेहरा वाचता येतो. पण सर्वांचा नाही तर जवळच्या माणसांचा असे बोलल्यावर बाजी वळून प्रेमाने हिराकडे कटाक्ष टाकतो. दरम्यान बोलता बोलता चिचोक्याचा हात हिराच्या हाताला लागतो आणि ती जोराने ओरडते. ते पाहून बाजी म्हणतो काय झालं?तेव्हा चिचोक्या बाजी आणि दाजीपुढे म्हणतो, आमची आक्का मला बरं वाटावं त्यासाठी नवस करते तसाच तिने हा नवस केला म्हणून हात जाळला. तेव्हा दादाजी विचारतात, कुणी जवळचं आजारी आहे का? त्यावेळी जे बाजी मात्र जे समजायचं ते समजून जातो आणि हिरा चिचोक्याच्या आजोबाला शोधायला आलोय हे कारण सांगून विषय बदलते. तेवढ्यात बाजीला कोतवाल हाक मारतात आणि बाजी निघुन जातो. दरम्यान चिचोक्याच्या आज्याला पाठमोरे बघून बिनीवाले त्याला शेरा समजतो आणि मागून जवळ जाऊन म्हणतो, मी सांगत होतो ते तुम्ही ऐकले नाही, आता बघा बाजी तुमची कशी उडवतो ते. इतक्यात चिचोक्या लांबून आपल्या आज्याला हाक मारतो, त्याचा आवाज ऐकून मागे वळलेल्या चिचोक्याच्या आज्याला बघून बिनीवाले गडबडून जातो आणि मंदिराती तूच हार चोर आहेस ना असे आज्याला म्हणतो. थोडाफार चिचोक्याचा आजोबा शेरा सारखाच दिसत असल्याने बिनीवालेंच्या मनात काहीतरी कारस्थान शिजू लागतो. काही वेळाने बिनीवाले शेराला भेटून सगळी हकीकत सांगून म्हणतो तो म्हातारा अगदी तुमच्यासारखाच दिसतो आणि बावन्न खणीत राहतो. हे ऐकून शेरा बिनीवालेवर जाम खुश होतो आणि म्हणतो आता बाजीची मी शेवटची भेट घेणार. बाजीला भेटायला जाणाऱ्या शेराला बाजी जेरबंद करण्यात यशस्वी होईल का हे बघण्यासाठी बाजी या मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका.