मुंबई : योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांना लाखो लोक फॉलो करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी रामदेव बाबा यांनी अभिनेता आमिर खानपासून (Aamir Khan) बॉलिवूडवरील अनेक सेलिब्रिटींवर निशाणा साधला होता. दरम्यान, आर्यवीर आणि वीरांगना परिषदेत सहभागी होण्यासाठी बाबा रामदेव शनिवारी मुरादाबादमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी ड्रग्ज विषयी बोलताना सगळ्यात आधी बॉलिवूडवर निशाणा साधला. बॉलिवूडचे मोठे कलाकार ड्रग्ज घेतात आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्री ड्रग्जच्या विळख्यात आली आहे. याशिवाय सलमान खान (Salman Khan) ड्रग्ज घेतो असा दावा बाबा रामदेव यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : 'तो त्या ग्रुपमध्ये अॅड झाला नाही आणि 14 दिवसांनंतर...', या मराठी अभिनेत्रीनं सुशांत सिंह राजपुतविषयी केला मोठा खुलासा


'दैनिक भास्कर'च्या वृत्तानुसार, बाबा रामदेव यांनी लोकांना संबोधित करताना असेही सांगितले की, शाहरुख खानचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला आणि तो तुरुंगातही गेला. रामदेव म्हणाले, 'सलमान ड्रग्जही घेतो. पण आमिर ड्रग्ज घेतो की नाही हे माहीत नाही. आज संपूर्ण बॉलिवूड ड्रग्जच्या विळख्यात आहे. बाबा रामदेव पुढे म्हणाले की, 'कलाकारांचा देव तर मालिक आहे.'


शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र ६ महिन्यांनंतर या प्रकरणात आर्यनला एनसीबीने क्लीन चिट दिली. (Baba Ramdev Targets Bollywood Says Salman Khan Takes Drugs Whole Film Industry Is Trapped) 


हेही वाचा : 'अरे हा तर टकला...', हृतिक रोशनच्या या व्हायरल व्हिडीओवरून एकच चर्चा


बाबा रामदेव यांनी बॉलिवूड किंवा खान स्टार्सवर अशाप्रकारे निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. वर्षभरापूर्वी जेव्हा अॅलोपॅथी आणि आयुर्वेदात भांडण झालं तेव्हा रामदेव यांनी आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' शोचा एक जुना व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, 'या मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल तर आमिर खानविरोधात आंदोलन करा.' 



याशिवाय 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरही बाबा रामदेव यांनी बॉलिवूडवर हल्लाबोल केला. तेव्हा ते म्हणाले होते की, 'बॉलिवूडच्या ड्रग्सनं मिळून देशाची फाळणी केली आहे. त्यानंतर बाबा रामदेव एका मुलाखतीत म्हणाले होते की, ते बॉलिवूडमधील सर्व बड्या स्टार्सशी बोलणार आहेत. त्यानंतर रामदेव यांनी अमिताभ बच्चनपासून सलमान, आमिर आणि शाहरुख खानपर्यंत नावं घेतली आणि त्यांना सुशांत आणि ड्रग्जवर मौन सोडण्यास सांगितले आणि देशाला ड्रग्जमुक्त करण्यास मदत करा असे देखील सांगितले.