मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 13 वर्षांपासून लोकप्रिय शो मानला जातो. हा शो इतका लोकांच्या मनात भरलाय की, त्यातील सर्व पात्र लोकांना खरी वाटू लागली आहेत. केवळ जेठालालच नाही तर त्यांचे चाहतेही TMKOCच्या 'बबिता जी'च्या मागेही वेडे झाले आहेत. आता बबिता जी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ताचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.


बादशहाच्या गाण्यावर बबिताचा डान्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री मुनमुन दत्ता ही सोशल मीडिया लवर आहे हे सर्वांना माहितीये. ती दररोज सोशल मीडियावर काहीतरी शेअर करत असते. नुकतंच आता मुनमुन दत्ताचा एक व्हिडिओ ट्रेंड होत आहे. यामध्ये तीने तिच्या जबरदस्त डान्सने लोकांची मनं जिंकली आहेत.


या व्हिडिओमध्ये मुनमुन दत्ता बादशाहच्या 'जुगनू' या सुपरहिट गाण्यावरील मूव्ह्स दाखवले आहेत. या डान्सची सिग्नेचर स्टेप खूप कठीण आहे मात्र मुनमुनने एकदम आरामात आणि परफेक्टपणे ही स्टेप केली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by (@mmoonstar)


अफेअरच्या अफवा


यापूर्वी मुनमुनने तिचा कोस्टार राज अनादकटसोबत अफेअर असल्याच्या अफवेमुळे चर्चेत आली होती. या प्रकरणाच्या अनेक बातम्या समोर आल्यानंतर त्यांनी प्रचंड नाराजीही व्यक्त केली होती.