अमिताभ यांचे खरे आडनाव `बच्चन` नाही तर...
`कौन बनेगा करोडपती ९` च्या ग्रँड फिनाले एपिसोडचे प्रसारण नुकतेच पार पडले. यावेळी हॉटसीटवर बाल कामगार विरूद्ध लढणारे आणि बालकांच्या अधिकारांबाबत मोहिम करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी बसले होते.
मुंबई : 'कौन बनेगा करोडपती ९' च्या ग्रँड फिनाले एपिसोडचे प्रसारण नुकतेच पार पडले. यावेळी हॉटसीटवर बाल कामगार विरूद्ध लढणारे आणि बालकांच्या अधिकारांबाबत मोहिम करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी बसले होते.
यावळी त्याच्यासोबत त्यांची पत्नी सुमेधा या देखील होत्या. शोच्या या एपिसोडमध्ये कैलाश सत्यार्थी आणि अमिताभ बच्चन यांनी आपआपल्या जीवनातील काही अनुभव शेअर केलेत.
बच्चन यांचे खरे आडनाव हे आहे...
यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपल्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या. यात बच्चन हे आपले खरे आडनाव नाही. माझ्या वडिलांचे आडनाव श्रीवास्तव होते. ते जाती-पातीवर विश्वास ठेवत नव्हते. मला लहानपणापासून घरातील आणि शेजारचे बच्चा-बच्चा म्हणायचे. यामुळे पुढे जाऊन माझ्या वडिलांनी माझे आडनाव बच्चन ठेवले. मी माझ्या कुटुंबातील पहिला व्यक्ती आहे की ज्याचे आडनाव बच्चन आहे.
या शोमध्ये कैलाश सत्यार्थी यांनी १ कोटी रुपयांपर्यंतचा टप्पा गाठला पण त्या ठिकाणी त्यांनी गेम सोडला. त्यांना ५० लाख रुपये जिंकला आले.